आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपकडून टीका:संबोधनापूर्वी राहुल गांधींनी विचारले, क्या बोलना है? भाजप नेत्याने शेअर केला व्हिडियो

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. मालवीय यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी काही काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांसोबत दिसत आहेत. आज कोणत्या विषयावर बोलायचे, काय बोलायचे, असे राहुल व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवर अनेकदा निशाणा साधणाऱ्या भाजप नेत्याने शनिवारी सकाळी एक व्हिडिओ जारी केला आहे. राहुल गांधी शुक्रवारी त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर तेलंगणाला पोहोचले होते.

मालवीय यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी काही काँग्रेस नेत्यांसोबत एका खोलीत दिसत आहेत. व्हिडीओमध्ये राहुल गांधी 'काय बोलायचे आहे, मला नेमके काय म्हणायचे आहे?' असे विचारताना ऐकू येते. राज्यातील शेतकऱ्यांच्या एका कार्यक्रमाला संबोधित करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्याचा दावा केला जात आहे. यादरम्यान कोणीतरी त्यांचे वक्तव्य शूट केले.

व्हिडियो शेअर करत भाजप नेत्याने टोमना लगावला आहे की, 'जेव्हा तुम्ही वैयक्तिक परदेशी सहली आणि नाईट क्लबिंग यामध्ये राजकारण करत असता तेव्हा असे होते', असा टोला मालवीय यांनी राहुल गांधींना लगावला आहे

17 सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये राहुल गांधी खुर्चीवर बसून इतर नेत्यांना विचारताना दिसत आहेत, 'आजचा मुख्य विषय काय आहे... मला नेमकं काय बोलायचे आहे, मला नेमकं काय म्हणायचं आहे?' राहुल गांधी वारंगलमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जाहीर सभेला संबोधित करणार होते.

बातम्या आणखी आहेत...