आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्राविरोधात जोरदार हल्लाबोल केला. 'केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अवघ्या 8 वर्षांतच देश नष्ट केला. आज देशात लोकशाही नाही, 4 जणांची हुकूमशाही सुरू आहे. भारतात लोकशाहीची दररोज हत्या सुरू असून, तुम्ही या हुकूमशाहीचा आनंद घेत आहात का?,' असे राहुल म्हणाले.
'विरोधकांची महागाई, सरकारी यंत्रणांचा गैरवापर, जीएसटी आदी मुद्यांवर बोलण्याची इच्छा आहे. पण आमची संसदेतच नाही तर बाहेरही मुस्कटदाबी केली जात आहे,' असे ते काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
'आज देशात उघडपणे लोकशाहीची हत्या सुरू आहे. हे उघड सत्य आहे. पण जो कुणी याविरोधात आवाज उंचावण्याचा प्रयत्न करतो, त्याचा आवाज अत्यंत क्रूरपणे शांत केला जात आहे. मुस्कटदाबी करणे हाच या सरकारचा मुख्य अजेंडा आहे,' असे राहुल म्हणाले.
'खरे बोलणे ही माझी मुख्य समस्या आहे. मी नेहमीच बेरोजगारीसारखे जनहिताचे प्रश्न उपस्थित करतो. याऊलट सरकार 24 तास खोटे बोलण्यात धन्यता मानते. पण काँग्रेसची बाजू सत्याची असल्यामुळे आम्ही कुणालाही घाबरत नाही,' असेही राहुल यांनी यावेळी सरकारला ठणकावून सांगितले.
'मी जेवढे लोकांचे मुद्दे उपस्थित करेल, तेवढे माझ्यावर हल्ले होतील. जेवढे माझ्यावर हल्ले होतील, तेवढा माझा फायदा होईल. ईडी अधिकाऱ्यांनी मला काय प्रश्न विचारले हे तुम्ही त्यांनाच जावून विचारा,' असा उलटप्रश्नही त्यांनी यावेळी पत्रकारांना केला.
हिटलरशाहीचा आरोप
'हिटलरच्या हातात सर्वच संस्था होत्या. त्यामुळे तो बिनधोकपणे निवडणुका जिंकत होता. भारतातही हेच सुरू आहे. सरकारच्या विचारधारेचे लोक सर्वच घटनात्मक संस्थांत बसलेत. यामुळेच कुणी सरकारविरोधात बोलले तर त्याच्यावर या यंत्रणा तुटून पडतात. लोकशाही आज देशातून हद्दपार झाली आहे. विस्मरणात गेली आहे,' असे राहुल म्हणाले.
'आमचे काम विरोधकांचे आहे. आम्ही अनेक मार्गांनी आपला विरोध प्रकट करू. पण विरोध करणे सोडणार नाही. सरकारने वाटेल ते करावे. आम्ही मागे हटणार नाही. खरे बोलणे सोडणार नाही,' असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील मोठ्या गोष्टी
1. सर्वच घटनात्मक संस्थांत RSS चे लोक - 'देशातील जनता, व इलेक्टोरल यंत्रणा विरोधकांची ताकद असते. पण याच संस्थावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक बसलेत. त्यांच्यावर सरकारचे नियंत्रण आहे. काँग्रेसच्या राजवटीत या संस्था न्यूट्रल होत्या. काँग्रेस सरकार त्यात हस्तक्षेप करत नव्हते. पण आज या संस्था सरकारच्या बाजूने उभ्या राहिल्यात. कुणी विरोध केला तर त्याच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे.'
2. लोकशाही 8 वर्षांत नष्ट - देशातील लोकशाहीचा मृत्यू झाला आहे. तुम्हाला कसे वाटत आहे? जी लोकशाही मागील 70 वर्षांत उभी केली गेली, ती अवघ्या 8 वर्षांतच नष्ट करण्यात आली.
3. खरे बोलले, तेवढे हल्ले होतील - 'माझी समस्या ही आहे की मी खरे बोलतो. महागाई, बेरोजगारी आदी जनहिताचे मुद्दे उपस्थित करतो. भीती दाखवणारा घाबरट असतो. देशात आज जी स्थिती उद्भवली आहे, ते त्याला घाबरत आहेत. त्यांना आपले कोणतेही आश्वासन पूर्ण करता आले नाही. त्यांना जनतेच्या शक्तीची भीती वाटत आहे. यामुळेच ते 24 तास खोटे बोलत आहेत.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.