आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Targets Narendra Modi; Over BBC Controversy | London | Congress | PM Modi

मी नाही, मोदींनी देशाचा अवमान केला:राहुल गांधी म्हणाले - सरकारला प्रश्न करणाऱ्यांवर हल्ला होतो, BBC सोबतही हेच झाले

लंडन25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय लोकशाहीची संरचना संकटात सापडल्यामुळे भारत जोडो यात्रा गरजेची झाली होती, असे राहुल गांधी म्हणाले. - Divya Marathi
भारतीय लोकशाहीची संरचना संकटात सापडल्यामुळे भारत जोडो यात्रा गरजेची झाली होती, असे राहुल गांधी म्हणाले.

ब्रिटनच्या 7 दिवसीय दौऱ्यावर गेलेल्या खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा खुल्या व्यासपीठावरुन नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. लंडनमधील इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनने इंडिया इनसाइट्स अंतर्गत राहुल गांधींशी वार्तालाप केला. यावेळी राहुल म्हणाले - देशाचा अवमान मी नाही, तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात.

राहुल म्हणाले की, पंतप्रधान मोदी किंवा त्यांच्या सरकारला प्रश्न करणाऱ्यांवर नेहमीच हल्ला केला जातो. BBC सोबतही हेच झाले. राहुल यांनी यावेळी प्राप्तिकर विभागाचा छापा, लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी व भारत-चीन संबंधांवरही भाष्य केले.

वाचा राहुल काय-काय म्हणाले...

  • मी नाही मोदींनी केला देशाचा अवमान : काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी परदेशात जाऊन स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षांत काहीच झाले नसल्याचा दावा केला. ते म्हणाले होते की, आम्ही एक दशक गमावले आहे. भारतात प्रचंड भ्रष्टाचार आहे. हे सर्व ते परदेशात म्हणाले होते. मी केव्हाच माझ्या देशाचा अपमान केला नाही. मी असे केव्हाही करणार नाही. 70 वर्षांत काहीच झाले नाही असा ते दावा करतात तेव्हा तो सर्वच भारतीयांचा अपमान नाही का?
  • सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांवर हल्लाबोल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एखादा समर्थक असेल, तर त्याचेही अंधपणे समर्थन केले जाते. याऊलट मोदी किंवा त्यांच्या सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांवर हल्लाबोल केला जातो. असाच प्रकार ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन BBC सोबत घडला आहे. बीबीसीने गुजरात दंगलीवर डॉक्युमेंट्री बनवली. त्यावर मोदी सरकारने वाद निर्माण केला. हा एक अपप्रचार असल्याचा दावा केला.
  • मी PM पदाचा दावेदार असणे चर्चेचा विषय नाही : राहुल यांना यावेळी ते पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले – मी पंतप्रधानपदाचा उमेदवार असणे हा चर्चेचा विषय नाही. भाजप व संघाला पराभूत करणे ही विरोधकांची मध्यवर्ती कल्पना आहे.
  • मला मोदींची शैली मान्य नाही : एक व्यक्ती संपूर्ण समस्या सोडवतो ही कल्पनाच मुळात वरवरची आहे. जनतेशी बोलून प्रश्न सुटतात. त्यासाठी हितधारक व सरकार यांच्यात संवाद आवश्यक आहे. गोष्टी सुरळीत करण्यासाठी जादूची कांडी घेऊन वरपासून खालपर्यंत फिरणाऱ्या नरेंद्र मोदींची व्यक्तीकेंद्री शैली मला मान्य नाही.
राहुल गांधींनी ब्रिटन दौऱ्यावर जाण्यापूर्वी आपला लुक चेंज केला. नव्या लुकमध्ये ते ट्रिम्ड बीयर्डमध्ये दिसून येत आहेत.
राहुल गांधींनी ब्रिटन दौऱ्यावर जाण्यापूर्वी आपला लुक चेंज केला. नव्या लुकमध्ये ते ट्रिम्ड बीयर्डमध्ये दिसून येत आहेत.

रविवारी अनिवासी भारतीयांना संबोधित करणार

राहुल गांधी आठवडाभराच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. केंब्रिज विद्यापीठात बिग डेटा अँड डेमोक्रसी शिवाय ते भारत-चीन संबंधांवरील क्लोज्ड रुम सेशनमध्येही सहभागी होणार आहेत. याशिवाय ते आयओसीच्या यूके चॅप्टर अंतर्गत ओव्हरसीज कार्यक्रमातही बोलणार आहेत. ते एका संसदीय कार्यक्रमासह यूके चॅथम हाऊसच्या प्रीमियर थिंक टँक कार्यक्रमातही आपले विचार मांडणार आहेत. राहुल 7 मार्च रोजी मायदेशी परत येतील.

राहुल गांधी यांच्या ब्रिटन दौऱ्याशी संबंधित खालील बातमी वाचा...

राहुल गांधींनी केली चीनची प्रशंसा:म्हणाले - चीन शांतताप्रिय देश, तेथील सरकार एखाद्या कॉर्पोरेशनसारखे काम करते

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठात चीनची प्रशंसा केली आहे. ते म्हणाले की, चीनचे इन्फ्रास्ट्रक्चर पाहा, तेथील रेल्वे असो किंवा विमानतळ, सर्वकाही निसर्गाशी निगडीत आहे. चीन निसर्गाशी घट्टपणे जोडलेला आहे. दुसरीकडे अमेरिकेविषयी बोलायचे तर तो स्वतःला निसर्गापेक्षा मोठा समजतो. यावरून चीनला शांतता आवडते हे स्पष्ट होते. तेथील सरकार एखाद्या कॉर्पोरेशन सारखे काम करते. येथे वाचा संपूर्ण बातमी...

बातम्या आणखी आहेत...