आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Attacks On Pm Narendra Modi For 8400 Crore Plane And Without Bullet Proof Truck For Jawans

काँग्रेसचे टीकास्त्र:'पंतप्रधानांना 8400 कोटींचे विमान अन् जवानांना नॉन बुलेटप्रूफ ट्रकमधून शहीद होण्यासाठी पाठवले जातेय', राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकारकडून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसाठी खरेदी करण्यात आलेल्या व्हीव्हीआयपी विमानांच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी विविध कारणांवरुन शिवसेनेवर निशाणा साधताना दिसत असतात. आता त्यांनी व्हीव्हीआयपींसाठी विमान खरेदी केल्यानंतर केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्रकमधून प्रवास करणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत लिहिले की, 'आपल्या जवानांना नॉल बुलेटप्रूफ ट्रकमधून शहीद होण्यासाठी पाठवले जात आहे आणि पंतप्रधानांसाठी 8400 कोटींचे विमान…हा न्याय आहे का?' असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे. केंद्र सरकारकडून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसाठी खरेदी करण्यात आलेल्या व्हीव्हीआयपी विमानांच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

आज पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एका ट्रकमध्ये जवान बसले आहे जे आपसात बोलत आहेत. त्यामधील एक जवान म्हणतो की, नॉन बुलेट प्रूफ गाड्यांमध्ये पाठवून आपल्या जीवाशी खेळ केला जात आहे. गेल्या आठवड्यात शेतकरी विरोधी बिलाच्या विरोधात पंजाबमधील आंदोलनादरम्यान राहुल गांधींनी आरोप लावला होता की, पीएम मेदींनी देशाच्या विरोधी निती आणि कार्यांनी देशाला कमजोर केले आहे.