आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Bharat Jodo Yatra | Congress Leaders Meet COVID Victims Family In Karnataka

राहुल यांच्यासमोरच चिमुकली रडत म्हणाली - बाबा आता आमच्यात नाहीत:ते मला पेन्सिल आणून द्यायचे, मला डॉक्टर व्हायचंय; तिचे शब्द ऐकून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कर्नाटकात दाखल झाली आहे. 30 सप्टेंबर रोजी राहुल यांनी कोरोनादरम्यान ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे प्राण गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांची भेट घेतली. यादरम्यान एका मुलीच्या भाषणाने उपस्थित सर्वजण भावुक झाले. ऑक्सिजनची कमतरता तेव्हा आपल्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे अवघ्या सात वर्षाच्या प्रतिक्षाने सांगितले.

प्रतीक्षा म्हणाली की, बाबा जिवंत होते. तेव्हा त्यांच्याकडून पेन्सिल, पुस्तके घ्यायचे. आता माझ्या आईकडे माझ्यासाठी काहीही विकत घेण्यासाठी पैसे नाहीत. माझ्या आईला सरकारी नोकरी मिळाली तर मी चांगला अभ्यास करू शकेन. मला डॉक्टर व्हायचे असून मी लोकांचा जीव वाचवणार आहे.

यादरम्यान अनेक महिलांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पती, भाऊ आणि नातेवाईकांचा मृत्यू कसा झाला हे सांगितले. पतीच्या निधनामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाल्याचे एका महिलेने सांगितले. सरकारी मदत मिळाली नाही तर मुलांच्या भविष्याचे काय होणार, असे म्हणत त्यांनी आपले दु:ख मांडले.

राहुल यांचा पंतप्रधान मोदींना सवाल

कोरोनाग्रस्त कुटुंबांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, पंतप्रधान, भाजप सरकारच्या कोविड गैरव्यवस्थापनामुळे वडिलांना गमावलेल्या प्रतीक्षाचे बोलणे ऐका. ती आता शिक्षणासाठी मदत मागत आहे. कोविड पीडितांची कुटुंबे योग्य भरपाईसाठी पात्र नाहीत का? पीडितांना त्यांचे हक्क का दिले जात नाहिऐत, असा सवाल राहुल यांनी केला.

अधिकृत आकडेवारीत फक्त तीन मृत
राहुल म्हणाले की, कर्नाटक सरकारच्या आकडेवारीत राज्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या केवळ 3 आहे. माझे वडील, आई किंवा भावंडे कोरोनामध्ये राहिले नाहीत, असे लोक सरकारला सांगत आहेत. पण ते मानायला तयार नाहीत. या सर्व कुटुंबांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...