आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाचा वाढता संसर्ग पाहता केंद्र सरकारने राहुल गांधींना भारत जोडो यात्रा थांबवण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडावियांनी राहुल गांधींना एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत आहे. आरोग्य आणीबाणीची स्थिती आहे. देश वाचवण्यासाठी भारत जोडो यात्रा थांबवावी.
सरकारच्या आवाहनावर काँग्रेसने म्हटले आहे की, भारत जोडो यात्रेमुळे सरकार अस्वस्थ आहे. गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क घालून गेले होते का?
आरोग्य मंत्रालयाचे राहुल यांना पत्र - कोरोना प्रोटोकॉल पाळले जात नसतील तर यात्रा थांबवा
पत्रात 2 आवाहने करण्यात आली...
काँग्रेसने म्हटले - भारत जोडो यात्रेमुळे मोदी सरकार अस्वस्थ
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींनी म्हटले आहे की, भारत जोडो यात्रेमुळे मोदी सरकार अस्वस्थ आहे. सामान्य लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत आहे. गुजरात निवडणुकीच्या वेळी मोदी मास्क लावून गुजरातला गेले होते का असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.
कार्ती चिदंबरम यांचा भाजपला सवाल - अचानकच भारत जोडो यात्रेवर इतके लक्ष का?
काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी म्हटले की, मी अजून हे पत्र बघितले नाही. मात्र अद्याप तरी कोव्हिड प्रोटोकॉलविषयी काहीही नवे नियम आलेले नाहीत. संसदही सुरू आहे आणि कोव्हिड प्रोटोकॉलविषयी नवीन अधिसूचना जारी झालेली नाही. त्यांनी म्हटले की, मला हे कळत नाही की अचानकच भारत जोडो यात्रेकडे इतके लक्ष का दिले जात आहे?
7 सप्टेंबरपासून सुरु झाली यात्रा
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबरपासून सुरु झाली होती. आज ही यात्रा हरियाणात दाखल झाली आहे. राजस्थानात भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणावर गर्दी बघायला मिळाली. हजारोंच्या संख्येने लोक राहुल यांना भेटायला आणि यात्रेत सहभागी व्हायला दुसऱ्या जिल्ह्यांतून दाखल झाले. हरियाणातही त्यांच्यासोबत शेकडोंची गर्दी चालत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.