आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींनी स्वतःवर ओढले कोरडे:'भारत जोडो' यात्रेत एका मुलाला शिकवले कराटेचे तंत्र; लोकनृत्य 'ढिमसा'ही केले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधींनी कोडे मारणे बोनालू फेस्टिव्हलचा एक भाग आहे. हा उत्सव तेलंगणात साजरा केला जातो.

भारत जोडो यात्रेचा तेलंगणात 10 वा दिवस सुरू आहे. गुरुवारी यात्रेची सुरुवात रुद्रपुरममधून झाली. त्यानंतर अनेक ठिकाणी काँग्रेस नेते राहुल गांधी वेगवेगळ्या अंदाजांत दिसून आले. प्रथम त्यांनी एका मुलाला कराटेचे तंत्र शिकवले. त्यानंतर ढिमसा लोकनृत्यही केले. त्यानंतर सर्वात वेगळी गोष्ट ठरली बोनालू सेलिब्रेशन. त्यात त्यांनी स्वतःला कोरडे ओढले.

तेलंगणाच्या बोनालू फेस्टिव्हलमध्ये कोरडे ओढण्याची परंपरा

तेलंगणाच्या बोनालू फेस्टिव्हलमध्ये कोरडे मारण्याची परंपरा आहे. हे कोडे 'पोथाराजू' बनलेला व्यक्ती स्वतःच्या शरीरावर कोरड्यांनी मारून घेतो. पोथाराजू, बोनालू फेस्टिव्हलची देवीमाता महाकालीचा भाऊ आहे. तो देवीच्या सुरक्षेसाठी चाबूक चालवतो. पोथाराजूला देवी महाकालीच्या विविध रुपांतील 7 बहिणींचा भाऊही मानले जाते. राहुल गांधींनी आपल्या यात्रेत हाच अवतार घेतला.

राहुलचे 2 रंग; मुलाला पंच शिकवला, लोकनृत्य केले

कराटेत मुलाला पंचचे प्रशिक्षण देताना व ढिमसा लोकनृत्य करताना राहुल गांधी. यापूर्वी त्यांनी बथुकम्मा नृत्यही केले होते.
कराटेत मुलाला पंचचे प्रशिक्षण देताना व ढिमसा लोकनृत्य करताना राहुल गांधी. यापूर्वी त्यांनी बथुकम्मा नृत्यही केले होते.

रुद्रपुरममध्ये एक मुलगा कराटेच्या ड्रेसमध्ये दिसला. राहुलने त्याला बोलावून पंचिंगचे प्रशिक्षण दिले. यावेळी एक मुलगीही कराटेच्या ड्रेसमध्ये दिसून आली. राहुल गांधी जपानी मार्शल आर्ट फॉर्म अकीदोमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत. 2013 मध्ये त्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला होता. ते मार्शल आर्ट शिकण्यासाठी जपानलाही गेले होते. ते राष्ट्रीय पातळीवरील शूटिंग चॅम्पियनही आहेत. ते अनेक फायटिंग आर्ट्स फॉर्म्स शिकत आहेत.

भारत जोडो यात्रेत उद्या ब्रेक, 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एंट्री

तेलंगणात भारत जोडो यात्रा 19 विधानसभा व 7 संसदीय मतदार संघातील एकूण 375 किमीचा प्रवास करत आहे. उद्या म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी यात्रेला एक दिवसाचा ब्रेक असेल. त्यानंतर 7 नोव्हेंबर रोजी ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल. भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून सुरू झाली होती. तेलंगणात येण्यापूर्वी या यात्रेने केरळ, आंध्र प्रदेश व कर्नाटकात शेकडो किलोमीटरचा प्रवास केला आहे. तेलंगणात यात्रेसाठी 10 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...