आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुभाषिक यात्री हावभावांतून संवाद साधतात:भारत यात्री सीताराम म्हणाले, यात्रेत मधुमेहाचे रुग्ण फिट झाले, औषधे घेत नाही

लेखक: निखिल शर्मा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत पहिल्या दिवसापासून त्यांच्यासोबत चालत असलेले राजस्थान यूथ बोर्डाचे अध्यक्ष आणि भारत यात्री सीताराम लांबांचे म्हणणे आहे की राहुल गांधी घाबरत नाही. जेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते तेव्हाही घाबरत नव्हते आणि आताही ते नरेंद्र मोदींना घाबरत नाही. देशातून सुमारे 2500 किलोमीटरहून अधिक प्रवास करत 88 दिवसांनंतर भारत जोडो यात्रा राजस्थानात आहे. यावेळी आम्ही सीताराम लांबांसोबत बोललो. लांबांनी भारत जोडो यात्रा आणि राहुल गांधींसोबतच्या अनुभवांवर मनमोकळेपणाने संवाद साधला.

प्रश्न - इतक्या राज्यांनंतर भारत जोडो यात्रा आता राजस्थानात आली आहे. इथे तुम्ही काय वेगळे पाहता?

लांबा - राजस्थान हे माझे राज्य आहे. इथे काँग्रेसचे सरकार आहे. येथील काँग्रेसचे कार्यकर्ते उत्साहात आहेत. इथे आणखी जास्त आशा आहे.

चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्करही मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रेत सहभागी झाली होती.
चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्करही मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रेत सहभागी झाली होती.

प्रश्न - भारत जोडो यात्रेतून तुम्हाला कोणते नवे सामाजिक पैलू बघायला आणि शिकायला मिळाले?

लांबा - जो फिरेल आणि लोकांना भेटेल त्यालाच ज्ञान मिळेल. शंकराचार्यांनी जसा प्रवास केला होता, ही यात्रा तशीच आहे. शिकणे आणि स्वतःला विकसित करण्याची यात्रा आहे. स्वतःसोबत देशाला ओळखण्याची यात्रा आहे.

प्रश्न - 8-10 वर्षांपूर्वीचे राहुल गांधी आणि आताचे राहुल गांधी यांच्यात काय फरक आहे?

लांबा - मी खूप दीर्घ कालावधीपासून राहुल गांधींसोबत काम करत आहे. केंद्र आणि राजस्थानात काँग्रेसचे सरकार होते आणि ते जेव्हा भट्टा परसोलच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा मी पाहिले की शेतकऱ्यांसाठी त्यांनी 100 किमीची यात्रा केली. ते तेव्हाही शेतकऱ्यांच्या बाजूने उभे होते. आजही ते हेच करत आहेत. तेव्हा आमचे सरकार होते. मायावतींनी राहुल गांधींना दोन वेळा अटक केली होती. मात्र ते खंबीर राहिले. जर एखादा योद्धा असेल, जो न घाबरता नरेंद्र मोदींच्या डोळ्यांत डोळे घालून त्यांना आव्हान देऊ शकत असेल, तर ते राहुल गांधी आहेत. तेव्हा ते त्यांच्या सरकारलाही घाबरत नव्हते तर आता नरेंद्र मोदींना ते काय घाबरतील? ते निडर आहेत.

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत सीताराम लांबा.
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत सीताराम लांबा.

प्रश्न - तुम्ही भाजपशासित आणि इतर पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांतूनही प्रवास केला. तिथे यात्रेसमोर काय आव्हाने आली?

लांबा - आम्हाला कुठेही असे वाटले नाही. हा प्रवास खूप चांगला राहिला. यात प्रशासनाने जागोजागी सहकार्य केले. सरकारांकडून थोडाफार अडथळे आणण्याचा प्रयत्न होत होता. मात्र प्रवास चांगला राहिला. कम्युनिस्ट, जेडीएस, एनसीपी, शिवसेना सर्व पक्षांनी यादरम्यान आमचे स्वागत केले.

प्रश्न - यात्रेदरम्यान राजस्थानात अनेक घडामोडी घडल्या, यात्रेवर याचा काय परिणाम झाला?

लांबा - याचा काहीही परिणाम झाला नाही. ही लोकांची यात्रा आहे. नेते सर्व आपापल्याच गोष्टी सांगत असतात. आम्ही एका दिशेने निघालो आहोत. राहुल गांधींच्या विचारांना कोणतीही ताकद थांबवू शकत नाही. राजस्थानातील मुद्द्यापेक्षा भारत जोडो यात्रा महत्वाची आहे. आज यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व नेते राजस्थानात सोबतीने चालत आहेत.

प्रश्न - या यात्रेमुळे काँग्रेसची विचारसरणी, कल्पना सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत आहे का?

लांबा - जेथून यात्रा जाते, तिथे प्रत्येकजण म्हणतो- भारत जोडो, भारत जोडो. ही मुले आणि कार्यकर्तेच आमचा पाया आहे.

देशात 2500 किमीपेक्षा जास्त प्रवास करत 88 दिवसांनंतर भारत जोडो यात्रा राजस्थानात आहे. लांबा पहिल्या दिवसापासून यात्रेत चालत आहेत.
देशात 2500 किमीपेक्षा जास्त प्रवास करत 88 दिवसांनंतर भारत जोडो यात्रा राजस्थानात आहे. लांबा पहिल्या दिवसापासून यात्रेत चालत आहेत.

प्रश्न - या भागातून प्रथमच काँग्रेसची एखादी मोठी यात्रा निघत आहे. याचा काँग्रेसला कसा फायदा होईल?

लांबा - निश्चितपणे याचा परिणाम राजस्थानात दिसेल. राजस्थान सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यात आरोग्यविषयक योजना आहेत. चिरंजीवी, ओपीएससारख्या योजना आहेत.

प्रश्न - असे बोलले जात आहे की, यात्रींच्या आरोग्यावरही याचा परिणाम झाला आहे. वजन कमी झाले आहे.

लांबा - नक्कीच झाला आहे. ज्यांना छोटे-मोठे आजार होते. ज्यांना मधुमेह होता. तेही फिट झाले आहेत. आता कुणीही औषधे घेत नाही. दिनचर्या खूप चांगली आहे. वातावरणही खूप चांगले आहे. यात्रेत वेगवेगळ्या भाषा आणि भागातील लोक एकमेकांशी बोलतात. ज्यांना भाषा येत नाही ते हावभाव आणि इशाऱ्यांनी एकमेकांना बोलतात. यात्रेत एक छोटा भारतच बनला आहे.

लांबांचे म्हणणे आहे की शंकराचार्यांनी जशी यात्रा केली होती. ही यात्रा तशीच आहे. ही देशाला समजून घेण्याची यात्रा आहे.
लांबांचे म्हणणे आहे की शंकराचार्यांनी जशी यात्रा केली होती. ही यात्रा तशीच आहे. ही देशाला समजून घेण्याची यात्रा आहे.

प्रश्न - राजस्थानातून यात्रा थोडी जास्त काळ असणार आहे. काय कारण आहे?

लांबा - यात अंतर हे एक कारण आहे. यात्री सुरुवातीला घाबर होते. पायाला फोडही आले. वेदनाही झाल्या. मात्र आता शारीरिक मर्यादांच्या पुढे जात आम्ही लोकांमध्ये मिसळत जात आहोत.

प्रश्न - राहुल गांधींच्या अॅटिट्युडविषयी प्रश्न निर्माण केले जात होते. तुमचा अनुभव कसा राहिला?

लांबा - आज राहुल गांधी चालताना त्यांच्या स्वभावात वैशिष्ट्य जाणवते. ते नेहमी प्रेमानेच राहतात. मीडियाने त्यांच्याविषयी वातावरण तयार केले आहे. ज्या लोकांना देशावर कब्जा करायचा आहे त्यांच्यासोबत ते लढतात. ते अदानी-अंबानीच्या विचारसरणीशी लढतात. म्हणूनच लोक त्यांच्या पद्धतीने त्यांची प्रतिमा तयार करतात. दिल्लीत जेव्हा घटना घडली तेव्हा त्यांनी कुणालाही सांगितले नाही की, त्यांनी निर्भयाच्या भावाला कोणताही गाजावाजा न करता पायलट बनवले. त्यांचे मन इतके मोठे आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक व्यक्ती समान आहे. मग तो कंटेनरमध्ये स्वच्छता करणारा असो किंवा देशाचे राजकारण चालवणारा असो. त्यांच्यासाठी सर्व समान आहेत.

लांबांचे म्हणणे आहे की, भारत जोडो यात्रेचा राजस्थानात चांगला परिणाम दिसेल.
लांबांचे म्हणणे आहे की, भारत जोडो यात्रेचा राजस्थानात चांगला परिणाम दिसेल.
बातम्या आणखी आहेत...