आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकात शेवटच्या टप्प्यात निवडणूक प्रचार जोरावर असून सर्वच पक्षाचे नेत्यांकडून प्रचारसभा, भेटीगाठींवर भर दिला जात आहे. काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधीही प्रचारासाठी कर्नाटकात आहेत. रविवारी त्यांनी एका फूड डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीवरून प्रवास केला.
राहुल यांच्या दुचाकी प्रवासाचे व्हिडिओ आता सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. राहुल यांनी सुमारे 2 किलोमीटरपर्यंत या डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीवरून प्रवास केला. या दुचाकीवरून ते त्यांच्या हॉटेलपर्यंत गेले. राहुल यांची बंगळुरूत सायंकाळी सभा होणार आहे. त्यापूर्वी इथे उतरल्यावर त्यांनी हॉटेलपर्यंत जाण्यासाठी दुचाकीवरून प्रवास करण्याचा पर्याय निवडला.
शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे बंगळुरू देशभरात ओळखले जाते. वाहतूक कोंडीत जास्त अडकावे लागू नये म्हणून बरेच जण चारचाकीऐवजी दुचाकीला प्राधान्य देतात. दरम्यान, राहुल यांनीही बंगळुरूतून दुचाकीवरून प्रवास केला आहे.
कर्नाटक निवडणुकीशी संबंधित या बातम्याही वाचा...
भाजप दरोडा घालून सत्ता मिळवणारा पक्ष:हुबळीतील सभेतून सोनिया गांधींची प्रखर टीका, म्हणाल्या-त्यांना लोकशाहीची कदर नाही
कर्नाटक निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सोनिया गांधींनी काँग्रेसच्या वतीने पहिल्यांदाच हुबळीत प्रचार सभेला संबोधित केले. मंचावर येताच सोनियांनी भाजप हा लोकशाहीची पर्वा न करणारा पक्ष असल्याची टीका केली. सोनिया म्हणाल्या - भाजप हा असा पक्ष आहे जो लुटमार करून सत्ता बळकावण्यात माहीर आहे. त्यांना लोकशाहीची पर्वा नाही. (वाचा पूर्ण बातमी)
कर्नाटक निवडणूक 2023:स्थानिक मुद्द्यांमुळे काँग्रेसचे पारडे जड, भाजपचा जोर मोदी फॅक्टरवर; 10 मे राेजी मतदान
कर्नाटकमध्ये ८ मे रोजी प्रचार थंडावेल. १० मे रोजी मतदान होईल तर १३ मे रोजी निकाल जाहीर होईल. संपूर्ण प्रचार मोहिमेत भाजपवर ४० टक्के कमिशनखोरीचा आरोप लावण्यात काँग्रेसची सिद्धरामय्या-डीके शिवकुमार ही जोड यशस्वी ठरली. स्थानिक मुद्द्यांवरून काँग्रेसने भाजपला घेरल्याचेही दिसून आले. दुसरीकडे तिकीट वाटपानंतर बंडखोरी, नेतृत्वावरून संभ्रम, जुन्या नेत्यांनी दिलेली सोडचिठ्ठी, डगमगलेला लिंगायत पाठिंबा यात भाजपला आता हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाकडून अपेक्षा आहेत. त्यामुळेच बजरंगबलीचा मुद्दा उचलण्यात आला. (वाचा पूर्ण बातमी)
कर्नाटक निवडणूक:बंगळुरूत PM मोदींचा रोड शो पूर्ण; आता दुपारी शिवमोग्गा ग्रामीण आणि बंगळुरू सेंट्रलमध्ये होणार रॅली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बंगळुरूमध्ये रोड शो संपला आहे. पंतप्रधानांनी रविवारी 10 किमीचा रोड शो केला. तत्पूर्वी शनिवारी पंतप्रधानांनी बंगळुरूमध्ये 26 किमी लांबीचा रोड शो केला. रोड शोनंतर मोदी शिवमोग्गा ग्रामीण आणि बंगळुरू सेंट्रलमध्ये निवडणूक रॅली घेणार आहेत. दिवसाच्या शेवटी, संध्याकाळी 7 वाजता नांजनगुड येथील श्री. श्रीकांतेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना करतील आणि निवडणूक प्रचाराची सांगता करतील. (वाचा पूर्ण बातमी)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.