आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi: Congress Leader Rahul Gandhi Targets Narendra Modi Government Over China Action

राहुल गांधींचा मोदींवर निशाणा:2014 पासून पंतप्रधान सातत्याने मोठ्या चुका करत आहेत, यामुळे देश कमकुवत झाला, चीनने घुसखोरीसाठी याच वेळेची निवड का केली? राहुल गांधींचा सवाल

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधी म्हणतात की, आपले परराष्ट्र धोरण धोक्यात आहे, अर्थव्यवस्थादेखील ढासळली आहे
  • 'जवळच्या देशांशी आपले संबंध बिघडू लागले आणि म्हणूनच चीनने पुढे जाण्याचे धाडस केले'

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींविरूद्ध ट्विटर युद्ध सुरू केले आहे. राहुल यांनी शुक्रवारी सांगितले की 2014 पासून पंतप्रधान सतत मोठ्या चुका करत आहेत. यामुळे देश कमकुवत झाला आणि लोक संकटात सापडले.

चीनच्या मुद्यावर राहुल यांनी 3 प्रश्न उपस्थित केले.

  1.  अतिक्रमणासाठी चीनने याच वेळेची का निवड केली? 
  2. भारतामध्ये अशी कोणती परिस्थिती आहे ज्यामुळे चीनला आक्रमक होण्याची संधी दिली?
  3.  या क्षणी असे काय विशेष आहे, ज्याने चीनला खात्री पटली की ते भारताविरूद्ध हिम्मत करू शकतात?

कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की हे समजून घेण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या बाजू समजून घ्याव्या लागतील. देशाचा बचाव एका पॉइवर अवलंबून नसतो, तर हे काम अनेक ताकदींच्या संयोजनावर असते. हे कोऑर्डिनेशन अनेक व्यवस्थांचे असते. देशाचे संरक्षण हे, विदेशी संबंधांद्वारे, शेजारी देशांनी, अर्थव्यवस्थेद्वारे आणि लोकांच्या भावनांनी होत असते. त्या सर्व क्षेत्रात भारताला त्रास सहन करावा लागला आहे आणि संकट वाढले आहे.

'आपले परराष्ट्र संबंध कमकुवत झाले'
परराष्ट्र धोरणाबद्दल राहुल म्हणाले की जगातील अनेक देशांशी आपले संबंध चांगले राहिले आहेत. आपले नाते अमेरिकेशी आहे. मी याला स्ट्रॅटजिक पार्टनरशिप म्हणता येईल, जे फार महत्वाचे आहे. आपले संबंध रशियासोबत होते, युरोपियन देशांशी होते आणि हे सर्व देश आपले सहयोगी होते. आज आपले परराष्ट्र संबंध कामापुरते झाले आहेत. अमेरिकेबरोबरचे सद्य संबंधही व्यवहारावर आधारित आहेत. रशियाशी असलेले संबंधही विस्कळीत झाले आहेत. युरोपियन देशांसोबतचे संबंधही कामापुरतेच राहिले आहेत.

'शेजारील देशांशी संबंध बिघडले '
नेपाळ पूर्वी भारताचा जवळचा मित्र होता. भूतान आणि श्रीलंका हेदेखील जवळचे होते. पाकिस्तान सोडून सर्व शेजारी देश एकत्र काम करत होते आणि भारताला भागीदार मानत होते. आज नेपाळ आपल्यावर चिडला आहे, तिथले लोक संतप्त आहेत. श्रीलंकेने चीनला बंदरही दिले आहे. मालदीव आणि भूतान देखील अस्वस्थ आहेत. अशा प्रकारे, भारताने आपल्या जवळच्या परदेशी भागीदारांशी संबंध खराब केले.

50 वर्षातील सर्वात वाईट काळात अर्थव्यवस्था
भारताच्या अशा विशेषता होत्या, ज्याबद्दल आपण जगभर चर्चा करत होतो. आपल्याला त्यांचा अभिमान होता. सध्या अर्थव्यवस्था 50 वर्षांच्या सर्वात वाईट टप्प्यात आहे. कोणताही दृष्टीकोन नाही, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. गेल्या 40-50 वर्षात बेरोजगारी सर्वाधिक आहे. आपली शक्ती अचानक कमजोर कशी बनली?

'सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही, त्यामुळे आर्थिक संकट वाढले'
आम्ही सरकारला अनेकदा लक्ष देण्यास सांगितले. हे समजून घ्या की आपण दररोज असुरक्षित बनत आहोत. आम्ही सरकारला सांगितले की, कृपया अर्थव्यवस्था हाताळण्यासाठी पैसे खर्च करा. छोट्या व्यापाऱ्यांना वाचवण्यासाठी हे त्वरित करा, परंतु त्यांनी नकार दिला. यामुळे आज आपला देश आर्थिक पेचात सापडला आहे. परराष्ट्र धोरण धोक्यात आले आहे. शेजार्‍यांशी संबंध खराब झाले आहेत. म्हणूनच चीनने भारताविरूद्ध हिम्मत करण्यासाठी ही वेळ निवडली.