आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Congress President Post | Congress Top Leadership Latest News Updates; Rahul Gandhi, Sonia Gandhi, Anil Shastri And Kapil Sibal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसमध्ये कलह:अनिल शास्त्री म्हणाले - जर सोनिया आणि राहुल यांनी नेत्यांना भेटायला सुरुवात केली तर 50% समस्या संपेल, सिब्बल म्हणाले - पद नाही तर देश महत्वाचा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. यात नेतृत्व बदलण्याच्या मागणीबाबत वातावरण तणावपूर्ण झाले होते.
  • सोमवारी कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत नेतृत्व बदलावरून गोंधळ झाला
  • नुकतेच 5 माजी मुख्यमंत्र्यांसह 23 नेत्यांनी सोनिया यांना पत्र लिहिले

काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलावर होणारा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. पक्षाचे नेते आता उघडपणे बोलत आहेत. काँग्रेस नेते अनिल शास्त्री म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात काही गोष्टींचा अभाव आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठकी होत नाही. एखाद्या वेगळ्या राज्यातून पक्षाचा नेता दिल्लीत आला तर त्याच्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना येथे भेटणे सोपे नाही.

ते म्हणाले, "जर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासारखे ज्येष्ठ नेते पक्षाच्या नेत्यांना भेटायला लागले तर 50% समस्या संपेल." अनिल हे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे धाकटे चिरंजीव आहेत.

कपिल सिब्बल म्हणाले-- पद नाही तर देश महत्वाचा

संजय झा म्हणाले - ही अंताची सुरुवात

काँग्रेसमधून निलंबित नेते संजय झा यांनी आज ट्विटर करत काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ही अंताची सुरुवात आहे. संजय काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की 100 पेक्षा जास्त काँग्रेस नेत्यांनी नेतृत्वात बदल करण्याबाबत सोनिया यांना पत्र लिहिले होते. मात्र, त्यावेळी काँग्रेसने ते नाकारले.