आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Plea In Sc Challenging Promotion Of Judge Who Convicted Rahul Gandhi; Congress | Supreme Court | Rahul Gandhi

कोटा नियमानुसार पदोन्नती:राहुल गांधींना दोषी ठरवणाऱ्या न्यायाधीशांच्या बढतीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात शिक्षा सुनावणारे सुरत न्यायालयाचे न्यायाधीश हरीश वर्मा यांच्या पदोन्नतीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यायाधीश वर्मा यांच्यासह 68 न्यायाधीशांच्या पदोन्नतीला आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात 8 मे रोजी सुनावणी होणार आहे. वास्तविक, या न्यायाधीशांना 65% कोटा नियमानुसार पदोन्नती देण्यात आली आहे. ज्याला वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश संवर्गातील दोन अधिकाऱ्यांनी आव्हान दिले आहे.

हरीश वर्मा यांनीच 23 मार्च रोजी राहुल गांधींनी मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणीशी संबंधित खटल्याची सुनावणी केली आणि त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

जजने राहुल गांधींचे काहीच ऐकले नाही:म्हणाले - खासदारकी जाणे भरून न निघणारे नुकसान नाही; वाचा 5 युक्तिवाद

काँग्रेस नेते राहुल गांधींना खासदारकी परत मिळाली नाही. सुरत सत्र न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती रॉबिन पॉल मोगेरा यांनी गुरुवारी त्यांची याचिका 'डिसमिस्ड' या अवघ्या एका शब्दांत फेटाळून लावली. राहुल यांनी मानहाणीच्या प्रकरणात दोषी ठरवण्याच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. न्यायाधीशांनी राहुल गांधींचे 5 मोठे युक्तिवाद फेटाळून लावले. ते म्हणाले की, खासदारी जाणे दोषसिद्धीला स्थगिती देण्याचा आधार नाही. यामुळे भरून न येण्यासारखे कोणतेही नुकसान झाले नाही. दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आपण पाहूया सुरत सत्र न्यायालयाने कोणत्या 5 आधारांवर राहुल गांधींची याचिका फेटाळून लावली? पूर्ण बातमी वाचा...