आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काँग्रेस नेते राहुल गांधी मागील अनेक दिवसांपासून ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहेत. मोदींनी आतापर्यंत फक्त स्वतःची प्रतिमा जपण्यात हित मानले. एकटे असताना हात हलवण्यापेक्षा मोदींनी मौन सोडले पाहिजे. त्यांनी आता सर्वांसमोर येऊन जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. अशी टीका राहुल यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी बुधवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये राहुल यांनी कोरोनासंदर्भात सरकारकडे असलेला दूरदृष्टीचा अभाव, देशातील लघूमध्यम उद्योगांची दुरावस्था आणि हाथरस प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.
PM जी, अकेले टनल में हाथ हिलाना छोड़ो, अपनी चुप्पी तोड़ो।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 7, 2020
सवालों का सामना करो, देश आपसे बहुत कुछ पूछ रहा है। pic.twitter.com/o6pVLjZlIO
"कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था आणि जनतेला खूप मोठा फटका बसेल, हे मी फेब्रुवारी महिन्यातच सांगितले होते. मात्र, त्यावेळी आपण 22 दिवसांत कोरोनाची लढाई जिंकू, असे मोदी सांगत होते. यावरुन कोणाला किती समज आहे, हे तुम्ही ठरवा."असेही राहुल म्हणाले.
राहुल म्हणाले की, "नरेंद्र मोदी यांनी देशातील लघूमध्यम उद्योग संपवले. कोरोना काळात त्यांनी स्वत:च्या उद्योगपती मित्रांना मदत केली. स्वत:च्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून मोदींनी भारताचा 1200 स्क्वेअर मीटरचा भूभाग देखील चीनला दिला. दरम्यान उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणानंतरही संपूर्ण व्यवस्था पीडितेच्या कुटुंबावर आक्रमण करते आणि पंतप्रधानांच्या तोंडून एक शब्दही निघत नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. आपल्याला उत्तरे द्यावी लागतील या एका कारणामुळे ते चीन आणि प्रसारमाध्यमांना घाबरतात असा घणाघातही राहुल यांनी केला. मोदींना केवळ आपली प्रतिमा जपण्यातच रस असल्याचेही राहुल म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.