आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राहुल गांधींचा सरकारवर पुन्हा निशाणा:सरकार आधी मुके होतेच, कदाचित आता आंधळे आणि बहिरेही झाले आहे - राहुल गांधी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशभरातील 6 लाख आशा सेविकांनी आपल्या हक्कासाठी पुकारला संप

देशभरातील 6 लाख आशा सेविकांनी आपल्या हक्कासाठी संप पुकारला आहे. याच मुद्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार आधी मुकं तर होतेच, कदाचित आता दृष्टिहीन आणि बहिरेही झाले आहे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी ?

देशातील प्रत्येक घरापर्यंत आशा सेविका आरोग्य सुरक्षा पोहोचवतात. खऱ्या अर्थानं त्या आरोग्य योद्धा आहेत, पण आज स्वतःच्या हक्कासाठी संप करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सरकार मुकं तर होतंच, कदाचित आता दृष्टिहीन आणि बहिरेही झाल आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

कोरोना चाचण्या करण्यासाठी आशा सेविकांची मदत घेतली जाते

कोरोनाचा संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून अधिकाधिक चाचण्या करण्याचे काम सुरू आहे. यासाठी आशा सेविकांची मदत घेतली जात आहे. सन्मानजनक आणि वेळेवर वेतन मिळावे, त्याचबरोबर वेतन निश्चित करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी देशातील 6 लाख आशा सेविकांनी संप पुकारला आहे.

0