आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Criticized On PM Modi | Says PM Fabricated A Fake Strongman Image To Come To Power

पंतप्रधानांवर निशाणा:राहुल गांधी म्हणाले - मोदींनी सत्तेत येण्यासाठी आपली खोटी मजबूत प्रतिमा बनविली, तीच आता भारताची सर्वात मोठी दुर्बलता बनली

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान मोदी चीनचे आव्हान स्वीकारतील का? राहुल गांधी यांचा सवाल

काँग्रेस नेते राहुल गांधी तीन-चार दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहेत. त्यांनी सोमवारी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला. राहुल यांनी ट्विट केले की, 'पंतप्रधानांनी सत्तेत येण्यासाठी आपली मजबूत प्रतिमा बनविली आहे. ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे, परंतु ही भारतासाठी आता सर्वात मोठी दुर्बलता आहे.'

राहुल यांनी ट्विट सोबत एक व्हिडिओ देखील शेअर केला. या व्हिडिओत त्यांनी चीनच्या रणनितीचा खुलासा केला. तसेच चीन आपल्या भागात आल्याची चिंताही व्यक्त केली. 

''रणनीतीशिवाय चीन कोणतेही पाऊल उचलत नाही. त्याच्या डोक्यात जगाचा नकाशा आहे आणि त्यानुसार तो त्याला आकार देत आहे. यामध्ये ग्वादर आणि बेल्ट अॅण्ड रोडचा देखील समावेश आहे.  तर मग जेव्हा आपण चिनींचा विचार करता तेव्हा आपल्याला हे समजले पाहिजे की ते कोणत्या स्तरावर विचार करीत आहेत.'' असे राहुल म्हणाले. 

''आता सामरिक पातळीकडे पहा. गलवान असे, डेमचोक असे किंवा पांगोंग लेक असो याठिकाणी चीन त्याची स्थिती मजबूत करीत आहेत. त्याचा हेतू स्पष्ट आहे - मजबूत स्थितीत येणे. चीन आपल्या महामार्गामुळे परेशान असून तो उद्ध्वस्थ करायचा आहे. सोबतच पाकिस्तानशी मिळून काश्मीरमध्ये त्याला काही करायचे आहे. यामुळे हा केवळ साधा वाद नाहीये.'' 

प्रभावी राजकारणी राहणे मोदींची मजबुरी 

''पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दबाव बनवण्यासाठी हा सुनियोजित सीमावाद आहे. चीन एका विशिष्ट प्रकारे दबाव टाकण्याचा विचार करत आहे. तो पंतप्रधानांच्या प्रतिमेवर हल्ला करत आहेत. त्यांना माहितीये की, मोदींसाठी प्रभावी राजकारणी राहणे ही मजबूरी आहे. एक राजकारणी म्हणून कायम राहण्यासाठी मोदींना आपल्या 56 इंचाच्या प्रतिमेचे रक्षण केले पाहिजे. चीन यावरच हल्ला करत आहे हे त्यांना समजले पाहिजे.'' असेही राहुल म्हणाले.  

मोदी चीनचे आव्हान स्वीकारतील का?

''आता प्रश्न पडतो की मोदी यावर काय प्रतिक्रिया देतील. ते याचा सामना करतील. ते चीनचे आव्हान स्वीकारतील. मी भारताचा पंतप्रधान आहे, मी तुमचा सामना करेल. मला माझ्या प्रतिमेची चिंता नाही असे ते चीनला ठासून सांगतील का? की त्यांच्यासमोर हत्यार टाकतील.'' असेही राहुल म्हणाले.