आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Did A Roadshow In Tamil Nadu, Said Central Government Does Not Respect Tamil Culture; Priyanka Worshiped In Assam

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल गांधींचा अनोखा अंदाज:तमिळनाडू दौऱ्यावर राहुल गांधींनी विद्यार्थ्यांसोबत केला डान्स, पुश-अप करत दिली मार्शलआर्टची ट्रेनिंग

कन्याकुमारी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नरेंद्र मोदींच्या मनात तामिळ लोकांबद्दल सन्मान नाही

काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी तमिळनाडु दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी मस्तीच्या मूडमध्ये दिसले. राज्यातील मुलागुमूदुमधील सेंट जोसेफ मॅट्रिकुलेशन हाययर सेकेंडरी स्कूलमध्ये राहुल गांधींनी आधी विद्यार्थ्यांसोबत डान्स केला, नंतर विद्यार्थ्यांना अकिडोची ट्रेनिंग दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत पुश-अपदेखील काढले.

विद्यार्थ्यांसोबत पुश-अप काढताना आणि मार्शल आर्टची ट्रेनिंग देताना राहुल गांधी

कन्याकुमारीत रोड शो

यापूर्वी राहुल गांधींनी कन्याकुमारीमध्ये रोड शो केला. यादरम्यान, त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या मनात तामिळ लोकांबद्दल सन्मान नाही. आम्ही मोदी आणि RSS ला तामिळ संस्कृतीचा अपमान करू देणार नाहीत. राहुल पुढे म्हणाले की, मोदी म्हणतात वन नेशन, वन कल्चर, वन हिस्ट्री. तामिळ भारतीय भाषा नाही ? तमिळनाडूचा इतिहास आणि संस्कृती भारतीय नाही? एक भारतीय नागरिक असल्यामुळे तामिळ संस्कृतीला वाचवणे माझे कर्तव्य आहे.'

बातम्या आणखी आहेत...