आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॅशनल हेराल्डप्रकरणी जवळपास साडेआठ तासांच्या चौकशीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कार्यालयाबाहेर पडलेत. ते तेथून थेट आपल्या घराकडे रवाना झालेत.
तत्पूर्वी, सकाळी त्यांची सलग 3 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर दुपारी 3 च्या सुमारास जेवणाची सुटी झाली आणि राहुल थेट सर गंगाराम रुग्णालयात दाखल असलेल्या सोनिया गांधींना भेटायला गेले. त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही होत्या. सुमारे 40 मिनिटांनंतर राहुल गांधी ईडीच्या कार्यालयात परतले. त्यानंतर त्यांची जवळपास साडेपाच तास पुन्हा चौकशी करण्यात आली. या मॅरेथॉन चौकशीनंतर राहुल रात्री 9.15 च्या सुमारास ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले.
दुसरीकडे, काँग्रेस प्रवक्ते व खासदार रणदीप सुरजेवाला यांनी पोलिसांवर माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्याशी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले -'पोलिसांनी चिदंबरम यांच्याशी झटापट केली. त्यांचा चश्मा जमिनीवर फेकला. यामुळे त्यांच्या डाव्या बरगडीला हेअरलाइन फ्रॅक्चर झाले. खासदार प्रमोद तिवारी यांनाही रस्त्यावर फेकण्यात आले. त्यांचेही डोके व बरगडीत फ्रॅक्चर झाले आहे. हीच लोकशाही आहे काय?'
याआधी सकाळी राहुल गांधी पूर्ण जोशात ईडीच्या कार्यालयात आले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना 50 हून अधिक प्रश्न विचारले. यापूर्वी काँग्रेसने या कारवाईला कडाडून विरोध केला होता. सकाळपासूनच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत ठिकठिकाणी राहुल यांचे पोस्टर लावले होते. ज्यावर लिहिले होते- ये राहुल गांधी है, झुकेगा नहीं. देशाच्या इतर भागांत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. काँग्रेसने सर्व नेत्यांना संध्याकाळी 5.30 वाजता पक्ष कार्यालयात बोलावले आहे.
अटकेत असलेल्या नेत्यांच्या भेटीला गेल्या प्रियांका
राहुल गांधींसोबत ईडी कार्यालयात जाणाऱ्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि काँग्रेस खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांचा समावेश आहे. प्रियांका गांधी यांनी तुघलक रोड पोलीस ठाणे गाठून या नेत्यांची भेट घेतली.
राहुल गांधींना घरातून ईडी कार्यालयात पोहोचण्यासाठी लागली 45 मिनिटे
काँग्रेस मुख्यालय ते ईडी कार्यालयापर्यंतचा रस्ता सील
काँग्रेसची कामगिरी पाहता दिल्ली पोलिसांनी काँग्रेस मुख्यालय ते ईडी कार्यालयापर्यंतचा रस्ता सील केला होता. ईडी कार्यालयाजवळ तीन थरांची सुरक्षा व्यवस्था आहे. काँग्रेसचा मोर्चा पहिल्या सर्कलजवळ पोलिसांनी रोखला होता. येथे कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापटही झाली. याआधी सोमवारी सकाळी राहुल गांधींच्या तपासाविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी काँग्रेस मुख्यालयातून ताब्यात घेतले.
राहुल-प्रियांका एकत्र निघाले होते
राहुल गांधींच्या हजेरीपूर्वी प्रियांका गांधी वाड्रा त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्या होत्या. येथून राहुल-प्रियांका काँग्रेस मुख्यालयात पोहोचल्या आणि पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह पक्षाचे खासदार आणि इतर नेते पायी चालत ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून काँग्रेसचा मोर्चा थांबवला आणि नेत्यांना पुढे जाऊ दिले नाही. राहुल गांधी प्रियांकांसोबत कारने ईडीच्या मुख्यालयात पोहोचले होते.
भाजपप्रमाणे आम्ही देशाची मालमत्ता विकली नाही: सुरजेवाला
काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी राहुल गांधींच्या चौकशीच्या निषेधार्थ म्हटले - नॅशनल हेराल्डमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही. नॅशनल हेराल्ड कंपनीने यंग इंडिया कंपनीची थकबाकी माफ करून कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले आहे. आम्ही भाजप सरकारप्रमाणे भारतातील सरकारी मालमत्ता विकल्या नाहीत.
विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया
अशोक गेहलोत : शांततापूर्ण मोर्चा काढण्यात सरकारला काय अडचण आहे?
भूपेश बघेल : तुम्ही या शरीराचा नाश करू शकता, पण विचारांना कैद करू शकत नाहीत.
प्रमोद तिवारी : राहुल गांधींवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.
दिग्विजय सिंह : मोदी घाबरतात तेव्हा ते ईडीला पुढे करतात.
सचिन पायलट : केंद्र सरकार एजन्सीचा गैरवापर करत आहे.
शिवसेना नेते संजय राऊत : राहुल गांधींवरील कारवाई बेकायदेशीर आहे. जो कोणी भाजपच्या विरोधात बोलेल त्याच्यावर कारवाई केली जाते.
रॉबर्ट वाड्रा : राहुल गांधी सर्व बिनबुडाच्या आरोपातून निर्दोष मुक्त होतील आणि सत्याचा विजय होईल.
कार्ती चिदंबरम : मला बहुतेक वेळा ईडीच्या नोटिसा मिळाल्या आहेत. मी ईडी प्रकरणातील काँग्रेसचा तज्ज्ञ आहे.
आज असिस्टंट डायरेक्टर लेव्हलवरील अधिकारी चौकशी करणार
ईडीच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर आज राहुल यांची सहायक संचालक स्तरावरील अधिकाऱ्याकडून चौकशी केली जाईल. इतर पाहुण्यांप्रमाणेच नेहमीच्या पद्धतीने चौकशी केली जाईल. तपासादरम्यान, राहुल गांधी त्यांचा मोबाइल फोन वापरू शकणार नाहीत किंवा त्यांच्यासोबत कोणत्याही राजकीय नेत्यांना ईडी कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.
प्रश्नांची लांबलचक यादी तयार
राहुल गांधींना चौकशीसाठी ईडीने प्रश्नांची एक लांबलचक यादी तयार केली आहे. सुमारे दोन डझन प्रश्न ईडीचे अधिकारी विचारतील, जे सर्व नॅशनल हेराल्ड आणि यंग इंडिया कंपनीशी संबंधित आहेत. राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांची यंग इंडिया कंपनीत 38-38% हिस्सेदारी आहे. उर्वरित काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे आहे. या दोन्ही नेत्यांचे निधन झाले आहे.
ईडीने सोनियांनाही बोलावले
ईडीने काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना 23 जून रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी 8 जून रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र 1 जून रोजी त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यामुळे त्या हजर होऊ शकल्या नाहीत. दरम्यान, रविवारी कोरोनामुळे सोनियांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
25 राज्यांत काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन
ईडीच्या देशातील 25 कार्यालयांबाहेर निदर्शने करण्यात येणार आहेत. जोपर्यंत राहुल गांधी ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत सर्व राज्यांमध्ये आंदोलने सुरूच राहणार आहेत. त्यासाठी काँग्रेसने सर्व राज्यांमध्ये जय्यत तयारी केली आहे. नुकत्याच झालेल्या प्रदेश प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
काय आहे प्रकरण?
1938 मध्ये काँग्रेस पक्षाने असोसिएट जर्नल्स लिमिटेड (AJL) ची स्थापना केली. या अंतर्गत नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र प्रकाशित करण्यात येऊ लागले. त्यावेळी एजेएलवर 90 कोटींहून अधिक कर्ज होते आणि ते दूर करण्यासाठी आणखी एक कंपनी स्थापन करण्यात आली होती. ज्याचे नाव यंग इंडिया लिमिटेड होते. यामध्ये राहुल आणि सोनियांचा वाटा 38-38% होता.
एजेएलचे 9 कोटी शेअर्स यंग इंडियाला देण्यात आले. या बदल्यात यंग इंडिया एजेएलचे दायित्व भरेल, असे सांगण्यात आले, परंतु जास्त भागीदारीमुळे यंग इंडियाला मालकी हक्क मिळाले. एजेएलच्या दायित्वांची पूर्तता करण्यासाठी काँग्रेसने दिलेले 90 कोटींचे कर्जही नंतर माफ करण्यात आले.
55 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप
2012 मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया आणि राहुल यांच्याविरोधात कोर्टात केस दाखल केली होती. यामध्ये स्वामींनी गांधी परिवारावर 55 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. मात्र, या प्रकरणात ईडीची एंट्री 2015 मध्ये झाली.
या प्रकरणात आतापर्यंत काय-काय झाले?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.