आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींनी व्यक्त केल्या भावना:'माझा मित्र गमावल्याचं खुप वाईट वाटतंय, ते काँग्रेसच्या आदर्शांना मूर्त रुप देणारे नेते होते'

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजीव सातव यांची 23 दिवसानंतर मृत्यूशी झुंज अपयशी

काँग्रेस खासदार ॲड. राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये मागील 23 दिवसांपासून उपचार सुरु होते. आज अखेर राजीव सातवांचा कोरोना व इतर आजारांसोबत केलेल्या संघर्षाचा शेवट झाला. सातवांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन सातव यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले, 'आज मी माझा मित्र गमावला. याचे मला फार दुःख आहे.राजीव सातव काँग्रेसच्या आदर्शांना मूर्त रुप देणारे नेते होते. राजीव सातव गेल्याने आपल्या सर्वांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी.'

राजीव सातवांना 21 एप्रिलला कोरोनाची लागण

राजीव सातव यांना 21 एप्रिल रोजी करोनाणी लागण झाली होती. यानंतर 23 एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरूवातीला त्यांची प्रकृती चांगली होती. पण, 25 एप्रिलनंतर प्रकृती बिघडली. काही दिवसानंतर प्रकृतीत पुन्हा सुधारत असल्याची माहिती येऊ लागली. पण, पण अचानक प्रकृती खालवल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

बातम्या आणखी आहेत...