आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काँग्रेस आज 136 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. मात्र अशा प्रसंगी राहुल गांधी परदेशात असल्याने भाजपने खिल्ली उडवली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोशल मीडियावर म्हटले की, काँग्रेस आपला 136 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत आणि राहुलजी '9 2 11' झाले.
कांग्रेस इधर अपना 136 वां स्थापना दिवस मना रही है और राहुल जी ‘9 2 11’ हो गये!!
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) December 28, 2020
भाजप फक्त राहुलला लक्ष्य करत आहे - काँग्रेसचे प्रत्युत्तर
भाजपला आक्रमक बनताना पाहून काँग्रेसला स्पष्टीकरण द्यावे लागले. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल म्हणाले की, राहुल आपल्या आजीला भेटण्यासाठी गेले आहेत. हे चुकीचे आहे का? प्रत्येकाला फिरायला जाण्याचा अधिकार आहे. भाजप घाणेरडे राजकारण करत आहे. ते केवळ राहुल यांना लक्ष्य करत आहेत.
राहुल यांच्या अनुपस्थितीची 101 कारणे असू शकतात
राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीची 101 कारणे असू शकतात. आपण कोणतेही अनुमान काढू नये. त्यांनी काही वैध कारणास्तव निर्णय घेतला असावा, असे सलमान खुर्शीद म्हणाले.
यापूर्वीही राहुल यांच्या परदेश दौऱ्यावर निशाणा साधला होता
संसद अधिवेशनादरम्यान राहुल आणि सोनिया गांधी परदेशातून परतले. तेव्हा दोघेही इटलीहून परत आले आहेत आणि संक्रमण पसरवू शकतात म्हणून राहुल-सोनियाची कोरोना टेस्ट करायला हवी, असे भाजप खासदार म्हणाले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.