आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Hit Out At Prime Minister Narendra Modi Over The State Of The Economy, Rise In COVID 19 Cases And External Aggression

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा:मोदींनी निर्माण केलेल्या आपत्तीमध्ये देश अडकला आहे; अर्थव्यवस्था, सीमेवरील घुसखोरीसह राहुल गांधींनी मांडले 6 मुद्दे

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधींनी जीडीपीतील ऐतिहासिक घट आणि विक्रमी बेरोजगारीचा उल्लेख केला
  • राहुल गांधी 3 दिवसांपूर्वी देखील बोलले होते की, 40 वर्षांत प्रथमच अर्थव्यवस्थेत प्रचंड मोठी मंदी आहे

कोरोना, अर्थव्यवस्था आणि चीनच्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी बुधवारी ट्वीट करून म्हटले आहे की मोदींनी निर्माण केलेल्या आपत्तीत भारत देश अडकला आहे. राहुल यांनी असे 6 मुद्दे मांडले -

1. जीडीपीमध्ये 23.9% ऐतिहासिक घट 2. 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी 3. 1 कोटी लोकांनी नोकर्‍या गमावल्या 4. केंद्र सरकार त्यांचा थकबाकी जीएसटी राज्यांना देत नाही 5. कोरोनाचे रोज सर्वात जास्त प्रकरण आणि मृत्यू 6. सीमेवर बाह्य घुसखोरी

राहुल यांनी 3 दिवसांपूर्वीही सरकारवर निशाणा साधला होता
कॉंग्रेसच्या नेत्याने 30 ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. ते म्हणाले होते की, "भारतीय अर्थव्यवस्था 40 वर्षांत पहिल्यांदाच मंदावली आहे. असत्याग्रही काँग्रेस नेते याचा सर्व दोष देवाला देत आहेत. नोटाबंदी, चुकीचे जीएसटी आणि इन-फॉर्मल इकॉनॉमीवर हल्ल्याचे 3 मोठे उदाहरण आहे.''

भाजपने निशाणा साधला होता - राहुल यांनी जी -23 व्हिडिओ जाहीर करावा
कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या असंतोषाचा आढावा घेताना भाजपने हे सांगितले होते. जी -23 म्हणजे काँग्रेसच्या त्या 23 नेत्यांना म्हटले होते. ज्यांनी पक्षामध्ये बदल करण्याची गरज असल्याचे पत्र लिहिले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser