राहुल गांधींची हरियाणात प्रचारसभा:म्हणाले - काँग्रेसचे सरकार आल्यास न्याय योजना लागू करणार; गरिबांना वार्षिक 72 हजार रुपये देणार
पानीपतएका महिन्यापूर्वी
कॉपी लिंक
हरियाणातील भारत जोडोच्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधी यांनी पानीपतच्या हुड्डा मैदानात प्रचारसभा घेतली. त्यात राहुल गांधी म्हणाले - कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेला 112 दिवस झालेत. आज आपण पानीपतच्या ऐतिहासिक ठिकाणी उभे आहोत.
काँग्रेसने 2019 मध्ये न्याय नामक एक योजना आणण्याची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत प्रत्येक गरीब व्यक्तीच्या खात्यात 72 हजार रुपये दिले जाणार होते. हे पैसे गरीब मजूर व शेतकऱ्यांना मिळणार होते. हरियाणात आमचे सरकार आले तर ही योजना लागू केली जाईल.
राहुल गांधींच्या भाषणाचे अपडेट्स...
राहुल म्हणाले - या यात्रेद्वारे भारतीयांना एकमेकांशी जोडले जात आहे. देशातील बेरोजगारी रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. पूर्वी स्वयंपाकाचा गॅस 400 रुपयांना मिळत होता. आता तो 1 हजारांवर पोहोचला आहे. पूर्वी 60 रुपयांना मिळणारे पेट्रोल 100 रुपयांच्या पार पोहोचले आहे.
राहुल गांधी म्हणाले की, सध्या माध्यमांवर सरकारचा अंकुश आहे. या यात्रेच्या माध्यमातून मी एकटाच नव्हे तर कोट्यवदी लोकांनी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडले आहे.
पूर्वी सैन्यात वार्षिक 80 हजार तरुण भरती होत होते. अग्निवीर योजनेत केवळ 40 हजार जणांची भरती होतील. 15 वर्षांची नोकरी विसरून जा. 4 वर्षांनंतर 75 टक्के तरुणांना घरी परतावे लागेल. केवळ 25 टक्के तरुणांना ठेवले जाईल. सैनिकांना केवळ 6 महिन्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. त्यांना पेंशनही मिळणार नाही. मी याविरोधात आवाज उठवला तर मला लष्करविरोधी ठरवले जाते.
राहुल गांधी म्हणाले - देशाची लोकसंख्या 140 कोटींवर पोहोचली आहे. देशाच्या अर्ध्या लोकसंख्येकडे असणारा पैसा केवळ 100 श्रीमंत लोकांकडे आहे.
भारतात 2 छोटे हिंदुस्तान अस्तित्वात आलेत. एक शेतकरी, मजूर, छोटे दुकानदार व बेरोजगारांचा. यात कोट्यवधी लोक राहतात. दुसरा भारत 200-300 जणांचा आहे. त्यांच्याकडे संपूर्ण संपत्ती एकवटली आहे. तुमच्याकडे काहीच नाही.
राहुल पुढे म्हणाले की, जीएसटी व नोटाबंदीमुळे देशातील उद्योग व्यवसाय संपुष्टात आला. लोकांना रोजगार देणारे उद्योगधंदे बंद पडले. आज 21 व्या शतकात देशातील 38 टक्के तरुण बेरोजगार आहेत.
रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी.
रॅलीचे अपडेट्स...
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, देशात महागाईचा भस्मासूर वाढत आहे. पण केंद्र सरकार त्याकडे डोळेझाक करत आहे. केंद्र केवळ श्रीमंतांसोबत आहे. राहुल गांधींचा संघर्ष महागाईविरोधात आहे. देशात एवढी बेरोजगारी केव्हाच उद्भवली नाही. राहुल गांधी यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. पीएम मोदी व अमित शहांना केवळ निवडणुकीशी देणेघेणे आहे. ते ईडी, प्राप्तिकर विभागाचा वापर करून काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करतात.
खरगे म्हणाले की, मोदी-शहा आपला लोकशाहीवर विश्वास असल्याचा दावा करतात. पण त्यानंतरही ते लोकशाहीमार्गाने अस्तित्वात आलेले सरकार पाडतात. भाजप खोट्याचे राजकारण करते. हे खोट्याचे सरदार आहेत. त्यांनी 2 कोटी रोजगाराची ग्वाही दिली होती. पण कुणालाही काहीच मिळाले नाही.
खरगे म्हणाले - गृहमंत्री अमित शहांनी त्रिपुरात राम मंदिर 1 जानेवारी रोजी अस्तित्वात येईल असे सांगितले. त्यांना बोलायला काय जाते. तिथे निवडणूक आहे. यामुळे ते असे बोलत आहे. ही गोष्ट एखाद्या पुजाऱ्याने सांगावी. यांना सांगण्याचा काय अधिकार आहे?
राहुल गांधींच्या रॅलीसाठी गोळा झालेली गर्दी.
राहुल आजही पानीपतमध्ये थांबणार नाहीत
राहुल गांधी आज रात्रीही पानीपतमध्ये थांबणार नाहीत. प्रचारसभेनंतर ते हेलिकॉप्टरने दिल्लीला परत जातील. त्यांच्या आई सोनिया गांधींची प्रकृती सध्या बिघडली आहे. त्यामुळे राहुल गुरुवारी रात्रीही दिल्लीला परतले होते. ते शनिवारी पानीपत येथून कर्नाळच्या दिशेने यात्रा सुरू करतील.
सभेची काही छायाचित्रे पाहा....
राहुल गांधींना त्यांचे वडील स्व. राजीव गांधी यांचे छायाचित्र भेट देताना हरियाणा काँग्रेसचे नेते.