आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Interrogated For 5 Hours On The Fifth Day; His Interrogation Lasted Until Midnight On Monday Night |marathi News

चौकशी:राहुल गांधींची पाचव्या दिवशी 5 तास चौकशी; सोमवारी रात्री त्यांची रात्री 12 पर्यंत चौकशी

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मंगळवारी पाचव्या दिवशीही सक्तवसुली संचालनालयाने सुमारे ९ तास कसून चौकशी केली. यापूर्वीप्रमाणेच राहुल सकाळी सव्वाअकराच्या सुमारा ईडी कार्यालयात हजर झाले. याआधी सोमवारी रात्री त्यांची रात्री १२ पर्यंत चौकशी करण्यात आली होती.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात झालेल्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी राहुल यांची चौकशी करत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही ईडीने २३ जून रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. एकीकडे ही चौकशी सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांची दिल्लीत उग्र निदर्शने सुरू आहेत. भाजप मुद्दाम राहुल गांधी यांना त्रास देत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान, केवळ राजकीय सुडापोटी सोनियांना २३ रोजी चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...