आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी म्हणाले - माझी आई लगेच आरसा दाखवते:बालपणी विचारले होते - मी सुंदर दिसतो का?; आई म्हणाली - नाही, ठीक ठाक आहेस...

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. त्यात त्यांनी एका खासगी मुलाखतीत आपल्या अनेक खासगी गोष्टींचा उलगडा केला. ते म्हणाले - 'लहानपणी मी माझ्या आईला विचारले होते की मी सुंदर आहे का? त्यावर माझ्या आईने माझ्याकडे पाहिले व म्हणाली...नाही, ठीक ठाक आहेस. तेव्हापासून माझ्या मनात पक्के बसले की मी सरासरी दिसतो.'

राहुल पुढे म्हणाले - 'माझी आई अशीच आहे. ती तत्काळ आरसा दाखवते. माझे वडीलही असेच होते. माझे संपूर्ण कुटुंब असे आहे. कोणतीही गोष्ट मोठी करू सांगत नाही. तुम्ही एखादी गोष्ट सांगितली, तर ते तुमच्यापुढे वस्तुस्थिती मांडतात.' राहुलने आपल्या या मुलाखतीची लिंक सोशल मीडियायवरही शेयर केला आहे.

माझे मित्र मला बूट पाठवतात, तर भाजपवाले माझ्यावर बूट फेकतात

राहुल यांनी रविवारी यूट्यूबर समदीश भाटियाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या बालपणीची कहाणी ऐकवली. एवढेच नाही तर आपल्या जीवनशैलीवरही चर्चा केली. ते म्हणाले - 'सामान्यतः मी स्वतःसाठी बूट खरेदी करतो. पण आता त्यांची आई व बहिण त्यांच्यासाठी हे काम करत आहे. राजकारणात माझे काही मित्रही आहेत. ते त्यांना बूट पाठवतात.' यावेळी यूट्यूबरने त्यांना 'तुम्हाला भाजपचे लोक बूट पाठवतात का?' असा प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले -'नाही नाही, ते केवळ माझ्यावर बूट फेकतात.'

यावेळी त्यांना 'राहुल गांधींना चालताना पाहण्यासाठी अलोट गर्दी होते?' असा प्रश्न करण्यात आला. त्यावर त्यांनी आपल्याला व्यक्तिशः देव मानण्याची प्रवृत्ती आवडत नसल्याचे ठामपणे सांगितले.

हे छायाचित्र 18 नोव्हेंबरचे आहे. भारत जोडो यात्रेत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी सहभागी झाले होते.
हे छायाचित्र 18 नोव्हेंबरचे आहे. भारत जोडो यात्रेत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी सहभागी झाले होते.

यूट्यूबरने विचारले - लोकांना तुमच्याकडून अपेक्षा आहेत?; राहुल म्हणाले - मी त्याच्याकडे एक नाते म्हणून पाहतो

यूट्यूबरने त्यांना 'लोकांना तुमच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असल्यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोप लागते काय?' असा सवाल केला. या प्रश्नालाही त्यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले - 'मी याकडे अपेक्षा म्हणून पाहत नाही. माझ्या मनात त्यांच्यासाठी प्रेम व अपार माया आहे आणि त्यांच्या मनातही माझ्याविषयी अशीच भावना आहे.'

राहुल म्हणाले - वनवासी विमान प्रवास करू शकत नाही

रविवारी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते व डायरेक्टर अमोल पालेकर व त्यांच्या पत्नीही सहभागी झाल्या.
रविवारी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते व डायरेक्टर अमोल पालेकर व त्यांच्या पत्नीही सहभागी झाल्या.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा रविवारी महाराष्ट्राच्या बुलढाण्यात पोहोचली होती. तिथे एका सभेला संबोधित करताना राहुल म्हणाले की, 'पंतप्रधानांनी आदिवासींसाठी वनवासी शब्दाचा वापर केला.' ते म्हणाले - 'या दोन्ही शब्दांचा अर्थ एकदम वेगळा आहे. आदिवासी म्हणतात तुम्ही भारताचे खरे मालक आहात. तर वनवासी म्हणतात की तुम्ही जंगलात राहता. याचा अर्थ वनवासी शहरात राहू शकत नाही. वनवासी विमान प्रवास करू शकत नाही. त्यांचा मुलगा इंजीनियर बनू शकत नाही, त्यांची मुलगी डॉक्टर बनू शकत नाही.'

बातम्या आणखी आहेत...