आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi; Jammu Kashmir Visit Update | Congress Demands Restoration Of Full Statehood For J&k; News And Live Updates

श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला:काँग्रेस कार्यालयापासून 500 मीटर अंतरावर हल्ला, राहुल गांधींने 2 तासापूर्वी केले होते उद्घाटन

श्रीनगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2 दिवसीय दौऱ्यावर राहुल गांधी

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी हा हल्ला शहरातील गर्दीचे ठिकाण असलेल्या अमिरा कडल भागात केला. विशेष म्हणजे या हल्ल्याच्या ठिकाणापासून काँग्रेस कार्यालय अवघे 500 मीटर अंतरावर आहे. त्यातच काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी 2 तासापूर्वी या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. आणि तेथून ते पुढील आयोजित दौऱ्यावर निघून गेले होते.

राहुल गांधी यांनी आज मंगळवारी श्रीनगरमध्ये काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले.
राहुल गांधी यांनी आज मंगळवारी श्रीनगरमध्ये काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, "अमिरा कडल पुलाजवळ ग्रेनेडने सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्याचा रस्त्याच्या कडेला स्फोट झाला." दरम्यान, या हल्ल्यात तारिक अहमद नावाचा एक नागरिक जखमी झाला आहे. 'दुपारी 2.40 च्या सुमारास दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या बंकरला लक्ष्य करत ग्रेनेड फेकला. या हल्ल्यात कोणतेही सुरक्षा कर्मचारी जखमी झाले नसल्याचे सीआरपीएफचे डीआयजी किशोर प्रसाद यांनी सांगितले आहे.

श्रीनगरमधील ग्रेनेड हल्ल्यानंतर घटनास्थळी वाहने आणि पोलीस दलाच्या काचा अशाप्रकारे विखुरल्या गेल्या..
श्रीनगरमधील ग्रेनेड हल्ल्यानंतर घटनास्थळी वाहने आणि पोलीस दलाच्या काचा अशाप्रकारे विखुरल्या गेल्या..

2 दिवसीय दौऱ्यावर राहुल गांधी
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवले आहे. या निर्णयाला 5 ऑगस्ट 2021 रोजी दोन वर्ष झाले. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी हे जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आले आहेत. विशेष म्हणजे कलम 370 हटवल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाचा दौरा आहे. त्यांनी मंगळवारी श्रीनगरमधील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

गर्दीच्या ठिकाणी पार्क केलेली अनेक वाहने ग्रेनेडच्या स्फोटामुळे खराब झाली.
गर्दीच्या ठिकाणी पार्क केलेली अनेक वाहने ग्रेनेडच्या स्फोटामुळे खराब झाली.
बातम्या आणखी आहेत...