आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Karnataka Visit Updates । Said Work Together For 2023 Assembly Elections; Do Not Speak Publicly About Internal Matters

कर्नाटक नेतृत्वाला राहुल गांधींचे आवाहन:2023च्या विधानसभा निवडणुकीसाठी मिळून काम करा; अंतर्गत विषयांवर जाहीर बोलू नका

बंगळुरू10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधी दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत सहभाग घेतला. येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर त्यांनी चर्चा केली. याच बैठकीत राहुल यांनी पक्षश्रेष्ठींना ऐक्य राखण्यास सांगितले.

कर्नाटक काँग्रेसमध्ये मतभेदाची चिन्हे असताना राहुल गांधी यांनी शीर्ष नेतृत्वाला 2023 च्या विधानसभा निवडणुकीसाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले आहे. नेतृत्व आणि अंतर्गत बाबींवर जाहीरपणे बोलू नका, असे त्यांनी नेत्यांना सांगितले आहे.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त देवनागेरे येथील जिल्हा मुख्यालयात आज म्हणजेच बुधवारी होणाऱ्या कार्यक्रमाला राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठा सोहळा आयोजित केला आहे. हे सिद्धरामय्या दलाचे शक्तिप्रदर्शन मानले जात आहे.

पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे शक्तिप्रदर्शन

कर्नाटकात सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार या काँग्रेसचे दोन प्रमुख नेत्यांतील संघर्ष लपून राहिलेला नाही. सिद्धरामय्या विधानसभेत पक्षाचे नेतृत्व करतात, तर डीके शिवकुमार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली, तर कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, यावरून दोन्ही नेत्यांमधील लढत तीव्र झाली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात असताना राहुल गांधींच्या कर्नाटक दौऱ्याला महत्त्व आहे. सिद्धरामय्या आणि शिवकुमार दोघेही मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय पक्ष घेईल असे सांगत असले तरी दोघांचे समर्थक मात्र मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून आपापल्या नेत्यांना बोलवत आहेत.

काँग्रेस सरचिटणीस म्हणाले - मुख्यमंत्री कोण होणार हे पक्ष ठरवेल

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, कर्नाटकमधील काँग्रेस युनिटच्या बैठकीत समितीने पक्ष संघटना आणि धोरण ठरवण्याबाबत चर्चा केली. ते म्हणाले की, या बैठकीत राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांना कर्नाटक आणि केंद्रातील भाजपच्या कुशासनाच्या विरोधात आक्रमकपणे काम करण्याचे आवाहन केले.

वेणुगोपाल म्हणाले की, जाणूनबुजून किंवा नकळत माध्यमांसमोर काही विधाने केली गेली. पक्षाच्या नेत्यांनी या फंदात पडू नये. नेत्यांनी पक्षांतर्गत किंवा पक्षाबाहेर वेगवेगळ्या आवाजात बोलणे टाळावे.पक्षात नेतृत्वाबाबत कोणताही मुद्दा नाही. कोणत्याही एका व्यक्तीचे मत ग्राह्य धरले जाणार नाही. पक्षाचा विजय झाल्यानंतर कोणाला मुख्यमंत्री करायचे हे नवे आमदार आणि हायकमांड ठरवतील.

बातम्या आणखी आहेत...