आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Kashmir News Update | Congress Leader's Rahul Gandhi First Visit After Abrogation Of Article 370

राहुल गांधींचा काश्मीर दौरा:कलम 370 हटवल्यानंतर काँग्रेस नेत्यांचा हा पहिलाच दौरा, 2 दिवसीय दौऱ्यात आज श्रीनगरला पोहोचतील राहुल गांधी

श्रीनगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुपकार नेत्यांसोबत घेणार बैठक

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवले आहे. या निर्णयाला 5 ऑगस्ट 2021 रोजी दोन वर्ष झाले. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी हे जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आले आहेत. विशेष म्हणजे कलम 370 हटवल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाचा दौरा आहे. या 2 दिवसीय दौऱ्यात ते आज संध्याकाळी श्रीनगरला पोहोचतील. ते सतत दोन राज्यातील कार्यकर्त्यांसोबत बैठका घेणार आहेत.

दरम्यान, या दौऱ्यात ते दुसऱ्या दिवशी श्रीनगरमधील एमए रोड येथे काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटनही करतील. त्यासोबतच हजरतबाल येथील शंकराचार्य मंदिरालाही राहुल गांधी भेट देणार आहेत.

गुपकार नेत्यांसोबत घेणार बैठक

खासदार राहुल गांधी या दौऱ्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर यांच्या घरी रात्रीचे जेवण करतील. यामध्ये गुपकार गटातील नेत्यांचादेखील समावेश असणार आहे. दरम्यान, यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस मोहम्मद युसूफ तारिगामी हे देखील डिनरला उपस्थित राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...