आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Lakhimpur| Rahul Gandhi And Sachin Pilot Lakhimpur Farmer Visit Latest News And Updates

लखीमपूर अपडेट:विमानतळावर अडवल्यानंतर अखेर राहुल गांधी सीतापूरमध्ये दाखल; प्रियंका गांधी सुद्धा पोहोचून पीडित कुटुंबियांच्या भेटी घेणार

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखीमपूरच्या घटनेनंतर राहुल गांधी दौऱ्यावर निघाले असताना एकानंतर एक झपाट्याने घडामोडी घडत आहेत. आधी प्रियंका गांधी यांना ताब्यातून सोडण्यात आले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी अशा दोन्ही काँग्रेस नेत्यांना लखीमपूरला जाण्याची परवानगी मिळाली. पण, लखनऊ येथे पोहोचल्यानंतर राहुल गांधींना विमानतळावरच अडवण्यात आले. यानंतर पुन्हा लखीमपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली.

विमानतळावर अडवले तेव्हा राहुल गांधी त्याच ठिकाणी आंदोलनाला बसले होते. यानंतर त्यांच्या वाहनांचा ताफा लखीमपूरच्या दिशेने निघाला.

तर दुसरीकडे दोन दिवसांपासून ताब्यात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची सुटका करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना चिरडणारे मोकाट फिरत आहेत. तर त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्यांना अटक करण्याचे काम भाजप सरकारकडून सुरू आहे. तरीही आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत राहू असे ट्विट प्रियंकांनी केले आहे. सचिन पायलट सुद्धा रस्ते मार्गे सीतापूरच्या दिशेने निघाले होते. पण, त्यांना दिल्ली-लखनऊ राष्ट्रीय महामार्गावर रोखण्यात आले.

आरोपीला अटक होण्याची शक्यता
याच दरम्यान लखीमपूर खिरीचा आरोपी आशीष मिश्र याला लवकरच अटक केली जाऊ शकते. आशीषचे वडील आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांनी बुधवारी गृह राज्य मंत्रालयाचे ऑफिस गाठले. यानंतर त्यांच्या मुलाच्या अटकेच्या शक्यता आणखी वाढल्या. शेतकऱ्यांना चिरडल्या प्रकरणी विविध शेतकरी संघटना आशीषच्या अटकेची मागणी करत आहेत.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे आंदोलक शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने कारखाली चिरडले. त्या घटनेच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या. शरद पवारांनी या घटनेची तुलना थेट ब्रिटिश काळातील जालियानवाला बाग हत्याकांडाशी केली. तर राहुल गांधी यांनी या घटनेचा संदर्भ घेऊन देशात सध्या हुकूमशाही कारभार सुरू असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...