आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिक्रिया:राहुल गांधींनी मानले मतदारांचे आभार; म्हणाले - जनतेच्या शक्तीने भांडवलशाही ताकदींचा पराभव केला, द्वेषाचा बाजार उठला

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतर दुपारी 2.30 वा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते पत्रकारांना 6 वेळा नमस्कार करत कर्नाटकातील द्वेषाचा बाजार उठून प्रेमाचा बाजार भरल्याचे स्पष्ट केले. 'कर्नाटकने देशाला प्रेम पसंत असल्याचे दाखवून दिले,' असे ते म्हणाले.

द्वेषाचा बाजार उठला, प्रेमाचा भरला

राहुल गांधी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले - 'सर्वप्रथम मी कर्नाटकच्या जनतेला, तथा या निवडणुकीत अपार कष्ट उपसणाऱ्या तेथील कार्यकर्त्यांना व नेत्यांचे अभिनंदन करतो. कर्नाटकच्या निवडणुकीत एकीकडे धनदांडग्या भांडवलदारांची ताकद होती. तर दुसरीकडे गरीबांची शक्ती होती. शक्तीने ताकदीचा पराभव केला. यापुढे हेच संपूर्ण देशात घडेल. काँग्रेस या निवडणुकीत गरीबांच्या बाजूने उभी होती. हा सर्वांचा विजय आहे. हा कर्नाटकच्या विजयाचा विजय आहे. मतदारांचे मनस्वी आभार.'

मतदारांना दिलेली आश्वासने पहिल्याच बैठकीत पूर्ण

'कर्नाटकातील द्वेषाचा बाजार उठला असून, प्रेमाचा बाजार भरला आहे. आम्ही ही निवडणूक घाणेरड्या शब्दांचा वापर करून लढली नाही. कर्नाटकच्या जनतेला आम्ही 5 आश्वासने दिली होती. ती पहिल्याच दिवशी पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत पूर्ण केले जातील. मी पुनःश्च कर्नाटकच्या मतदारांचे आभार मानतो,' असेही ते यावेळी म्हणाले.

भाजपने केला पराभव मान्य

राहुल यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी दीड तास अगोदरच भाजपने कर्नाटकातील आपला पराभव मान्य केला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर त्याची समीक्षा केली जाईल असे स्पष्ट केले. तसेच लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करण्याचा संकल्पही व्यक्त केला.

दुसरीकडे, निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, कर्नाटकात काँग्रेसचा 33 जागांवर विजय झाला असून, 104 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजपचा 25 जागांवर विजय झाला असून, 47 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. याशिवाय जेडीएसच्या खात्यात आतापर्यंत 4 जागा गेल्यात. त्यांचे 17 उमेदवार आघाडीवर आहेत. तर 4 जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत.

कर्नाटक निवडणुकीशी संबंधित खालील बातम्या वाचा...

आनंदाश्रू:कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष DK शिवकुमार यांना अश्रू अनावर ; म्हणाले - सोनिया मला तुरुंगात भेटण्यास आल्या होत्या

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय झाला आहे. पण याची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. काँग्रेसच्या या विजयाबद्दल पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले - या विजयाचे श्रेय मी माझे कार्यकर्ते व पक्षाच्या नेत्यांना देतो. त्यांच्याच कष्टामुळे हा विजय मिळाला.

डी के शिवकुमार यांचा त्यांच्या कनकपुरा विधानसभा मतदार संघातून विजय झाला आहे. त्यांनी कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक यांचा पराभव केला. विजयाची माहिती मिळताच शिवकुमार यांनी ईश्वराचे आभार मानले. तसेच मंदिरात माथा टेकून आपल्या घराच्या बाल्कनीतून समर्थकांचे अभिवादन केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना भावना अनावर झाल्या. त्यांनी रडतच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आपल्याला भेटण्यासाठी तुरुंगात आल्याची आठवण काढली. येथे वाचा संपूर्ण बातमी...

कानडी निवडणूक:कर्नाटकच्या भाजप सरकारचे 5 मंत्री पिछाडीवर, महसूल मंत्री आर अशोक यांचा कनकपुरा मतदार संघात पराभव

कर्नाटकात सत्ताधारी भाजपला जोरदार झटका लागला आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत भाजपचे 5 बडे मंत्री मागे पडले आहेत. महसूल मंत्री आर अशोक यांचा कनकपुरा विधानसभा मतदार संघात दारुण पराभव झाला आहे. त्यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी पराभव केला.

दुसरीकडे, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी गृहनिर्माण मंत्री व्ही सोमन्ना यांच्यावर आघाडी घेतली आहे. वरुणा मतदार संघात या दोन्ही नेत्यांत तगडी टक्कर सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील मतमोजणीनंतर या ठिकाणी सिद्धरामय्यांनी 1224 मतांची आघाडी घेतली होती. येथे वाचा संपूर्ण बातमी...

कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री?:काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज, रविवारी विधीमंडळ पक्षाची बैठक; हैदराबादेत रिसॉर्ट बुक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या गोटात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. पक्षाला मुबलक जागा मिळाल्या तर काँग्रेस विधीमंडळ पक्षाची रविवारी बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी शनिवारी सायंकाळपर्यंत विजयी उमेदवारांना राजधानी बंगळुरूला पोहोचण्याचे निर्देश देण्यात आलेत.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे स्वतः कर्नाटकात तळ ठोकून आहेत. त्यांची राज्यातील घटनाक्रमावर बारकाईने नजर आहे. यावरून काँग्रेस दक्षिणेतील या महत्त्वाच्या राज्यात आपली सत्ता स्थापन करण्याची कोणतीही संधी हातातून जाऊ न देण्याच्या प्रयत्नांत असल्याचे स्पष्ट होते. येथे वाचा संपूर्ण बातमी...

गडबड गोंधळ:कर्नाटकचे CM बसवराज बोम्मई ज्या BJP उमेदवारासोबत करत होते बैठक, त्या घरात शिरला साप; माजला गोंधळ

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलांत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. त्यातच हावेरी मतदार संघातून एक विचित्र घटना घडली आहे. तिथे भाजप उमेदवार शिवराज सिंह सज्जन यांच्या निवासस्थानी साप शिरला. विशेष म्हणजे याच ठिकाणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई भाजपच्या नेत्यांसोबत बैठक करत होते. त्याचवेळी ही घटना घडल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी हा साप तत्काळ पकडून घराबाहेर काढला.

बोम्मईंना काँग्रेसच्या पठाण यांचे आव्हान

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शिगगाव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस उमेदवार यासीर अहमद खान पठाण यांनी त्यांना आव्हान दिले आहे. या जागेवर सर्वांची नजर आहे. सलग चौथ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या बोम्मई यांनी सुरुवातीच्या कलांत पठाण यांच्यावर आघाडी घेतली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...