आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi | Loksabha Speaker Om Birla | Marathi News | Lok Sabha Speaker Om Birla Lashes Out At Rahul Gandhi; Said Who Are You To Give Permission In The Hall?

राहुल गांधींना फटकारले:लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला राहुल गांधींवर भडकले; म्हणाले- सभागृहात परमिशन देणारे तुम्ही कोण?

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले आहे. राहुल गांधी यांनी संसदीय प्रक्रिया योग्य प्रकारे न पाळल्याबद्दल ओम बिर्ला यांनी टीका केली आहे. बुधवारी सभागृहात बोलतान राहुल गांधींनी भाजपच्या एका खासदाराला बोलू दिले नव्हते.

बुधवारी सभागृहात लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांना फटकारे होते. त्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, मी लोकशाहीवादी आहे आणि मी दुसऱ्या व्यक्तीला बोलू देईन. यावर ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली असून, राहुल गांधींना फटकारले आहे. त्यावर अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, "ही परवानगी देणारे तुम्ही कोण आहात? तुम्ही त्यांना परवानगी देऊ शकत नाही, तो माझा अधिकार आहे.” "तुम्हाला कोणालाही परवानगी देण्याचा अधिकार नाही, फक्त लोकसभा अध्यक्षांनाच परवानगी देण्याचा अधिकार आहे," असे म्हणत ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना फटकारले. ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना कडक ताकीद देत आपले भाषण थांबवले आणि भाजप खासदार कमलेश पासवान यांना बोलण्याचे संकेत दिले.

राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावादरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केल्याची पाहायला मिळाले. देशाचा राजा कुणाचेच म्हणणे ऐकूण घेत नाही. अशी टिका राहुल गांधी यांनी केली होती. सभागृहात बोलताना राहुल गांधी यांनी आधीचे सभापती आणि भाजप खासदार कमलेश पासवान यांचे कौतुक केले. पासवान हे दलित आहेत, दलितांवर किती अन्याय झाला हे त्यांना माहीत आहे, पासवान हे चांगले माणूस असून, ते चुकीच्या पक्षात आहे. मी त्याचे बोलणे ऐकले आहे. त्यांना दलितांचा इतिहास माहीत आहे. असे राहुल म्हणाले होते. त्यावर पासवान यांनी सांगितले की, भाजपने त्यांना तीनदा खासदार केले आहे.

बातम्या आणखी आहेत...