आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज माउंट अबू दौऱ्यावर आहेत. काँग्रेसच्या सर्वोदय संगम शिबिरात सहभागी होण्यासाठी ते माउंट अबू येथे आले आहेत. भारत जोडो यात्रेनंतर राहुल आज पहिल्यांदाच राजस्थानमध्ये आले आहेत. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी माउंट अबूला पोहोचणार आहेत. तेथे ते अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राहुल गांधी दिल्लीहून विमानाने उदयपूरच्या दाबोक विमानतळावर पोहोचले. येथील दाबोक विमानतळावर मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह दोतासरा यांनी राहुल गांधी यांचे स्वागत केले.
ते उदयपूरहून हेलिकॉप्टरने माउंट अबूला जातील. माउंट अबू येथील सवाई नारायण धर्मशाळेतील काँग्रेस प्रशिक्षण शिबिराला ते उपस्थित राहणार आहेत. माउंट अबू येथे ते सुमारे सहा तास राहणार आहेत. माऊंट अबू येथून राहुल गांधी संध्याकाळी 5 वाजता निघून उदयपूरला पोहोचतील. संध्याकाळी, राहुल 6.50 वाजता उदयपूरहून नियमित विमानाने दिल्लीला जातील.
काँग्रेसच्या सर्वोदयी शिबिरातील प्रतिनिधींशी चर्चा
माऊंट अबू येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या सर्वोदयी प्रशिक्षण शिबिरातील प्रतिनिधींशीही राहुल गांधी चर्चा करणार आहेत. या 10 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा 10 मे समारोप होणार आहे. या शिबिरात विविध राज्यातील सुमारे 45 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
गेल्या वेळी तिजारा येथेल शिबिराला राहुल गांधींची व्हर्च्युअली हजेरी
राहुल गांधी यापूर्वीही काँग्रेसच्या सर्वोदयी शिबिरात सहभागी झाले होते. गेल्या वेळी तिजारा येथे झालेल्या शिबिरात त्यांनी व्हर्च्युअली हजेरी लावली होती. काँग्रेसच्या सर्वोदयी शिबिरांमध्ये कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या मूळ विचारसरणीचे प्रशिक्षण दिले जाते.
या शिबिरांमध्ये चरखासोबतच अनेक उपक्रम राबवले जातात. मुख्य लक्ष गांधीवाद आणि काँग्रेसच्या विचारसरणीवर असतो. ही शिबिरे वर्षातून तीन वेळा घेतली जातात. काँग्रेस प्रशिक्षण कक्ष नियमितपणे सर्वोदयी शिबिरे आयोजित करतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.