आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Nepal Night Club Party Video | Rahul Gandhi At Lord Of Drinks Kathmandu Nightclub Video Updates

लॉर्ड ऑफ ड्रिंक्समध्ये राहुल गांधी:नाइट क्लबचा व्हिडिओ व्हायरल, काँग्रेसने म्हटले- मित्राच्या लग्नालाही भाजपला विचारून जावं लागेल का?

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधी सध्या नेपाळच्या वैयक्तिक दौऱ्यावर आहेत. तेथील एका पबचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ते एका चिनी तरुणीसोबत दिसून येत आहे. असा दावा केला जात आहे की, हा नेपाळचा प्रसिद्ध पब LOD-Lord of Drinks असून ही महिला नेपाळमधील चीनच्या राजदूत हौ यांकी आहे.

दुसरीकडे भाजप यावरून आक्रमक झाला आहे. राहुल यांचा व्हिडिओ शेअर करताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सुटी, पार्टी, हॉलिडे, प्लेझर ट्रिप, प्रायव्हेट फॉरेन व्हिजिट इत्यादी गोष्टी देशासाठी नवीन नाहीत.

काही तासांनी प्रवक्त्यांनी दिले नेपाळ भेटीवर स्पष्टीकरण

या व्हिडिओवर कित्येक तास काँग्रेस किंवा राहुल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. नंतर प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, राहुल गांधी मित्र देश नेपाळमध्ये एका मित्राच्या लग्नाला गेले होते, जे एक पत्रकारदेखील आहेत. मित्रपरिवार असणे, लग्नसमारंभाला जाणे हाही आपल्या संस्कृतीचा भाग आहे. या देशात अजूनही लग्नाला जाणे गुन्हा नाही. कदाचित आजनंतर भाजप ठरवेल की लग्नाला उपस्थित राहणे बेकायदेशीर आहे आणि मैत्री करणे हा गुन्हा आहे. पण मला सांगा जेणेकरून आम्ही आमच्या मित्रांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाला उपस्थित राहण्याच्या प्रथा बदलू शकू.

नेपाळमधील रहिवाशाने शेअर केला व्हिडिओ

वृत्तानुसार, दोन्ही व्हायरल व्हिडिओ काठमांडू येथील रहिवासी भूपेन कुंवर यांनी 2-3 मे 2022 च्या रात्री फेसबुकवर शेअर केले होते. एका व्हिडिओमध्ये राहुल गांधी त्यांच्या फोनमध्ये व्यग्र आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते एका तरुणीसोबत उभे आहेत आणि तिच्याशी बोलत आहे. या तरुणीचे नाव नेपाळमधील चीनचे राजदूत होऊ यांकी असल्याचे सांगण्यात येत आहे. नेपाळमधील हा सर्वात मोठा आणि सर्वोत्तम नाईट क्लब असल्याचेही भूपेन यांनी लिहिले आहे.

लग्नात सहभागी होण्यासाठी गेले आहेत राहुल गांधी

काठमांडू पोस्टच्या बातमीनुसार, सुमनिमा उदास यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी स्वत: काठमांडूला गेले आहेत. त्या नेपाळमधील म्यानमारच्या राजदूताच्या कन्या आहेत. हा त्यांचा वैयक्तिक दौरा आहे. पण तिथे ते होऊ यांकी यांना (हनी ट्रॅप गर्ल) भेटले की नाही याचा तपास सुरक्षा यंत्रणांनी करायला हवा, असेही लोक म्हणत आहेत.

सुमनिमा यांचे वडील भीम उदास यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीचे मंगळवारी नीमा मार्टिन शेर्पासोबत लग्न होत आहे. त्यांचे रिसेप्शन 5 मे रोजी हयात रिजन्सी बुद्धा येथे होणार आहे.

का होत आहे हनी ट्रॅपची चर्चा?

व्हिडिओतील तरुणी ही चीनची राजदूत होऊ यांकी असल्याचे सांगितले जात आहे. 2020 मध्ये नेपाळमध्ये राजकीय नाट्य शिगेला पोहोचले असताना होऊ यांचे नाव समोर आले. यानंतर होऊ नेपाळचे राजकारण नियंत्रित करत असल्याचे बोलले जात होते. निवृत्त मेजर गौरव आर्य यांनी नेपाळचे पीएम केपी शर्मा ओली यांच्याबद्दल सांगितले होते की, ओली हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत आणि चीनकडे ओलींचा व्हिडिओही आहे. म्हणजेच, यांकीच त्यांना कंट्रोल करतात.

बातम्या आणखी आहेत...