आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi News; (Bihar) Election 2020 Rally Update West Champaran Darbhanga | Congress Rahul Gandhi Rally Latest News Live Updates Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारमध्ये राहुल गांधी:यावेळी रावणाऐवजी मोदी, अंबानींचे पुतळे जाळले; खोटे बोलण्यात पंतप्रधानांना कुणीही हरवू शकत नाही, राहुल गांधींचा हल्लाबोल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेसला देश कसा चालवायचा हे माहित आहे. तरूणांना नोकरी कशी द्यावी हे आम्हाला माहित आहे.

बुधवारी दरभंगा येथे पंतप्रधान मोदींच्या सभेच्या दोन तासानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पश्चिम चंपारणमध्ये सभा घेतली. ते म्हणाले की, आता रावणाच्या पुतळ्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचे पुतळे जाळले जात आहेत. खोटे बोलण्यात मोदींना कुणीही मागे टाकू शकत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.

राहुल यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

मोदींचे पुतळे का जाळले जात आहेत?
पंतप्रधान काही वर्षांपूर्वी येथे आले होते. मग म्हणाले की हे उसाचे क्षेत्र आहे, मी येथे साखर कारखाना सुरू करेन. पुढच्या वेळी मी येईन आणि आपल्याबरोबर येथील साखर चहामध्ये मिसळून पिईल. त्यांनी तुमच्याबरोबर चहा प्यायला का? साधारणत: दसऱ्याला रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे पुतळे जाळले जातात. यावेळी दसऱ्याला पंजाबमध्ये नरेंद्र मोदी जी, अंबानी जी आणि अदानी जी यांचे पुतळे जाळले जात असल्याचे पहिल्यांदाच पाहिले. भारतीय शेतकरी आज मोदीजींचा पुतळा का जाळत आहे? हा मोठा प्रश्न आहे. नितीशजींनी 2006 मध्ये बिहारबरोबर केले होते, ते 2020 मध्ये संपूर्ण पंजाब, बिहार, हिंदुस्थानसोबत मोदीजी करत आहेत.

तिन्हीही शेतकरी विधेयके शेतीवर आक्रमक
शेतीशिवाय, शेतकऱ्यांशिवाय शहर चालत नाही. हे भारताचे सत्य आहे. जे तीन कायदे मोदींनी आणले आहेत, ज्याचा पहिला पायलट प्रोजेक्ट बिहारमध्ये करण्यात आला होता, हे तिन्ही कायदे तुमच्या शेतीवर आक्रमण आहे. बिहारमध्ये 2006 मध्ये मंडी सिस्टम, किमान सपोर्ट प्राइस (एमएसपी) नष्ट झाली. शेतकर्‍याला समजते की आपल्या मालाला योग्य किंमत मिळू शकत नाही. त्यामुळे या सर्वांना आपला प्रिय प्रदेश सोडावा लागला. ते मुंबईला जातात, बंगळुरुला जातात. पण आनंदाने जात नाही. ते जातात कारण बिहारला नष्ट करण्यात आले आहे.

मोदींना माहिती आहे ते खोटे बोलले होते
आपले पंतप्रधान दिवसभर बिहारच्या सीएमसोबत भाषण देतात. म्हणतात की, मी साखर देईल, नंतर एकत्र चहा पिऊ. कधी दुसऱ्या देशांविषयी बोलतात. पण देशासमोर रोजगाराची सर्वात मोठी समस्या आहे. आता पीएम म्हणत नाहीत की, 2 कोटी रोजगार देईल. त्यांना माहिती आहे की, ते खोटे बोलले होते. मी गँरंटी देतो की, आज त्यांनी जर म्हटले की, ते 2 कोटी रोजगार देतील तर गर्दी त्यांना पळवून लावेल.

काँग्रेसने देशाला दिशा दिली
बिहारमध्ये युती आहे. आम्ही उर्वरित पक्षाबरोबर आरजेडीसोबत लढत आहोत. तेजस्वी रोजगाराविषयी बोलतात आणि कॉंग्रेस पक्ष त्यांच्याबरोबर निवडणुका लढवत आहे. कॉंग्रेस पक्षाने देशाला दिशा दिली आहे. मनरेगा, भोजनचा अधिकार दिला आहे, शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. आपल्याला देश कसा चालवायचा हे माहित आहे. तरूणांना नोकरी कशी द्यावी हे आम्हाला माहित आहे. पण आमच्यात एक कमतरता आहे की, आम्हाला खोटे बोलता येत नाही. खोटे बोलण्यात त्यांच्याशी स्पर्धा करु शकत नाही.