आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत? ते का लवपवत आहेत? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विचारला आहे. पुरे झाले, आता लोकांना देखील कळायला हवे की नेमके झाले तरी काय. चीन आमच्या सैनिकांना मारण्यासाठी आणि आपल्या जमीनीवर पाय सुद्धा ठेवण्याची हिंमत कशी करू शकतो असा जाब राहुल गांधी यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
Why is the PM silent?
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 17, 2020
Why is he hiding?
Enough is enough. We need to know what has happened.
How dare China kill our soldiers?
How dare they take our land?
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी या मुद्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फोर्स मॅगजीनचे संपादक प्रविण साहनी यांचे ट्विट शेअर केले. यामध्ये चीनसोबत चर्चा होत असताना कुणीही शस्त्रास्त्र बाळगू नये असा आदेश सरकारकडून मिळाला होता असा दावा करण्यात आला आहे.
Is it a fact Raksha Mantri ji? As far as I know Pravin Sawney is an insider who can’t be challenged on facts. https://t.co/dLIulqc3sk
— digvijaya singh (@digvijaya_28) June 17, 2020
चिनी सैनिकांनी धारदार शस्त्रांनी केला हल्ला
लडाखमध्ये चिनी अधिकाऱ्यांशी सोमवारी चर्चा करण्यासाठी गेलेल्या भारतीय अधिकारी आणि जवानांवर चीनने अचानक हल्ला केला. यात काठ्या, दगड आणि धारदार शस्त्रांनी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात भारताच्या कमांडिंग ऑफिसरसह 20 सैनिक शहीद झाले. या हिंसाचारात चीनचे सुद्धा 43 सैनिक ठार मारले गेल्याचा दावा केला जात आहे. परंतु, चीन सरकार किंवा लष्कराने अद्याप ही गोष्ट स्वीकारलेली नाही. 14 हजार फुट उंचीवर दोन्ही अण्वस्त्रसंपन्न देशांमध्ये 3 तास हा हिंसाचार सुरू होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.