आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi On Indo China Dispute| Rahul Gandhi Wrote 'Surender' Instead Of Surrender; People Said If You Send The Child To Harvard, Then He Will Write Surrender Only.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनवर राहुल यांचे पाचवे विधान:मोदींना 'सरेंडर मोदी' लिहिले, परंतु स्पेलिंग चुकली; लोक म्हणाले, मुलाला हार्वर्डला पाठविले तर तो सरेंडर ऐवजी सुरेंदर लिहील

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत-चीन सीमा वादावरुन राहुल पाच दिवसांपासून सरकारवर टीका करत आहेत

भारत आणि चीनमधील तणावामुळे सरकार आणि विरोधकांमध्ये झालेला वाद थांबत नाहीये. काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी रविवारी सलग पाचव्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्न उपस्थित केले आहे. राहुल गांधींनी रविवारी ट्वीट केले,"नरेंद्र मोदी खरं तर 'सरेंडर मोदी' आहेत." दरम्यान सरेंडर शब्द लिहिण्यात चुक झाली. राहुल यांनी सरेंडर ऐवजी सुरेंदर असे लिहिले. यानंतर ट्वीटर युझर्सनी त्यांची खिल्ली उडवायली सुरुवात केली. 

एक ट्विटर युझर राहुल शर्माने लिहिले की, जेव्हा तुम्ही मुलाला शिक्षणासाठी हार्वर्डमध्ये पाठवाल तर तो सरेंडरला सुरेंदरच लिहिलं. तर काही लोकांनी राहुल गांधीला सरेंडरची स्पेलिंग तपासण्याचा सल्ला देखील दिला. तर काहींनी चीनचे राष्ट्रपती जिनपिंगसोबत राहुल गांधीचे फोटो पोस्ट केले.  

एका ट्विटर युझरने जिनपिंगबरोबर राहुलचा फोटो पोस्ट केला

पंतप्रधान मोदींनी चीनला शरण जावे, असेही राहुल यांनी शनिवारी ट्विट केले. चीनच्या हल्ल्यापुढे पंतप्रधानांनी आत्मसमर्पण केल्याचे राहुल यांनी ट्विट केले होते. राहुल यांनी विचारले की जर जमीन चीनची असेल तर भारतातील सैनिकांना का शहीद व्हावे लागले?

बातम्या आणखी आहेत...