आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi On Narendra Modi | Wayanad Congress MP Attack On Government Before Budget Session 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्र सरकारवर निशाणा:देशातील सर्व शेतकऱ्यांना कृषी कायद्यांबाबत माहिती असती, तर संपूर्ण देशात आंदोलन पेटले असते- राहुल गांधी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2-3 मोठ्या उद्योगपतींसाठी काम करत आहे सरकार

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कृषी कायद्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींचा मतदारसंघ वायनाडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलत असताना राहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्व शेतकऱ्यांना कृषी कायद्यांबाबत माहिती नाही. त्यांना माहिती असती, तर संपूर्ण देशात आंदोलन झाले असते.

कृषी कायद्यांबाबत दिल्ली बॉर्डरवर पंजाब आणि हरियाणातील शेतकरी मागील दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्यांची मागणी आहे की, सरकारने हे कायदे परत घ्यावेत, पण सरकार ती मागणी मान्य करण्यास तयार नाही.

कृषी कायदे परत घेण्याची अपील

यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारशी तिन्ही कृषी कायदे परत घेण्याची अपील केली. यावेळी त्यांनी महत्मा गांधी यांचे एक वाक्य बोलून दाखवले. "विनम्रतेने तुम्ही जगाला जागे करू शकता.''

2-3 मोठ्या उद्योगपतींसाठी काम करत आहे सरकार

यावेळी राहुल यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, सर्वांना माहिती आहे की, मोदी सरकार देशातील 2-3 मोठ्या उद्योगपतींना फायदा मिळून देण्यासाठी काम करत आहेत. आज देशातील जवळपास सर्वच उद्योगांवर 3-4 लोकांची मालकी आहे.

बातम्या आणखी आहेत...