आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi On Pm Narendra Modi Corona Virus : The Prime Minister Is Silent, He Has Surrendered

राहुल गांधींचा मोदींवर निशाणा:पंतप्रधान गप्प आहेत, त्यांनी सरेंडर केलंय, राहुल गांधींनी आता कोरोना मुद्यावरून सरकारला घेरले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधत आहे. लद्दाखच्या गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या हिंसर चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांनी सातत्याने निशाणा साधला आणि त्यांना उत्तर मागितले. आज त्यांनी कोरोना व्हायरस संक्रमणावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकारजवळ कोरोनाचा सामना करण्यासाठी कोणतीही योजना नाही. 

राहुल गांधींनी ट्विट केले की, 'कोरोना विषाणू देशाच्या नवीन भागात वेगाने पसरत आहे. भारत सरकारकडे कोरोनाला सामोरे जाण्याची कोणतीही योजना नाही. पंतप्रधान गप्प आहेत. त्यांनी कोरोना महामारी समोर आत्मसमर्पण केले आहे. तसंच या आजाराला सामोरे जाण्यास नकार दिला आहे.

'देशातील संक्रमित रुग्णांची संख्याही पाच लाखांच्या पुढे गेली असताना राहुल गांधींनी कोरोना विषाणूच्या विषयावर मोदी सरकारवर निशाणा साधला. त्याच बरोबर पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की आपणास या आजारापासून मुक्ती कधी मिळेल हे मला ठाऊक नाही.'

माहित नाही कोरोनापासून कधी मुक्ती मिळेल - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी 'स्वावलंबी उत्तर प्रदेश रोजगार कार्यक्रम' च्या शुभारंभात म्हणाले की, माहिती नाही कोरोनापासून कधी सुटका मिळेल. कोरोना संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भविष्यात हा आजार कधी सुटणार हे कोणालाही ठाऊक नाही. आम्हाला त्याचे एक औषध माहित आहे. हे औषध म्हणजे दोन फूट अंतर ठेवणे.  तर दुसरे औषध म्हणजे - तोंड झाकून, चेहऱ्यावर मास्कर लावणे. कोरोनाची लस तयार होईपर्यंत आपण हे करुन कोरोनापासून बचाव करु शकतो. 

Advertisement
0