आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मन की बात'वर टीकास्त्र:पंतप्रधानांनी NEET-JEE परीक्षांवर चर्चा करण्याऐवजी खेळण्यांवर चर्चा केली- राहुल गांधी

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 68 व्या वेळी 'मन की बात' कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारतात खेळणी इंडस्ट्रीला मोठी भूमिका पार पाडायची असल्याचे म्हटले. यावर राहुल गांधी यांनी टीका केली आहे. पंतप्रधानांनी परीक्षांवर चर्चा करावी अशी JEE-NEET च्या विद्यार्थ्यांची इच्छा होती, पण ते खेळण्यांवर चर्चा करुन गेले, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.

राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमानंतर ट्वीट केले की, 'JEE-NEET च्या उमेदवारांना परीक्षेवर चर्चा हवी होती, पण पंतप्रधानांनी खेळण्यांवर चर्चा केली.' असा निशाना राहुल गांधीनी मोदींवर साधला आहे.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी ?

 • कोरोना काळामध्ये देशाच्या घरात उत्सव आयोजित केले जात आहेत. लोक स्वत: ची आणि लोकांची काळजी घेत त्यांचे काम करीत आहेत. ज्या प्रकारचा संयम पाळला जात आहे तो अभूतपूर्व आहे. पंतप्रधान म्हणाले की, गणेशोत्सव ऑनलाईन पद्धतीने साजरा केला जात आहे. पर्यावरणपूरक गणेशाची मूर्ती बसविण्यात आली आहे.
 • उत्सवांमध्ये पर्यावरणाचा संदेश लपविलेला असतो तर पर्यावरणासाठी अनेक सण साजरे केले जातात. बिहारच्या थारू समाजाने निसर्गाला जीवनाचा एक भाग बनवले आहे. 60 दिवस बरना उत्सव साजरा करतात. याकाळात कोणीही कोठेही येत-जात नाही.
 • यावेळी ओणम देखील साजरा केला जात आहे. त्याची लोकप्रियता परदेशापर्यंत आहे. हे शेतीशी संबंधित आहे. आपले सण शेतकऱ्यांच्या रंगानेच भरलेले असतात. या गोष्टी वेदात देखील सांगतल्या आहेत. अन्नदातास नमन हे ऋग्वेदात म्हटले आहे.
 • कोरोना काळात, देश अनेक आघाड्यांवर एकत्रित लढा देत आहे. असा विचार देखील केला जातो की घरात राहणाऱ्या मुलांचा वेळ कसा जाईल? मी कुठेतरी वाचले आहे की खेळण्यांच्या संदर्भात रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते की अपूर्ण असलेली खेळणी चांगली आहे. मुले खेळून तिला पूर्ण करतात.
 • आता मुलांचे आकर्षणाचे केंद्र खेळ नाही तर खेळणी बनले आहे. महागड्या खेळण्यांमध्ये बनवण्यासाठी-शिकण्यासारखे काहीच नसते. या खेळण्यांमध्ये संपत्तीचे दर्शन होते, मात्र मुलांसाठी यात काही विशेष नसते.
 • मुलांच्या खेळण्यांबाबत राष्ट्रीय शिक्षण धोरणातही सांगण्यात आले आहे. आता देशातील बरीच क्षेत्रे खेळण्यांचे केंद्र म्हणून विकसित होत आहेत. जागतिक खेळणी उद्योग 7 लाख कोटी रुपयांचा आहे, परंतु त्यामध्ये भारताचा वाटा कमी आहे.
 • खेळणे असे असावे ज्याला लहानपण खेळेल देखील आणि खेळवेल सुद्धा. आता कॉम्प्युटर गेम्सचे युग आहे. यापैकी बहुतेक थीम भारतीय आहेत. आत्मनिर्भर भारतात खेळणी उद्योगाला मोठी भूमिका पार पाडायची आहे. असहकार चळवळीच्या वेळी गांधीजी म्हणाले की ही भारतीयांमधील आत्मविश्वास वाढवण्याची एक चळवळ आहे. आम्ही स्वयंपूर्ण भारत चळवळीसह आहोत. असेच आपल्याला आत्मनिर्भर भारत आंदोलनासोबत करायचे आहे.
 • आमच्या मुलांना त्यांची पूर्ण क्षमता दर्शविण्यात सक्षम होण्यासाठी पोषण ही मोठी भूमिका बजावते. सप्टेंबर हा पौष्टिक महिना म्हणून पाळला जाईल. असे म्हणतात की, जसे अन्न असते, तसेच मन असते.
 • पोटात वाढणाऱ्या मुलांसाठी आईला देखील आवश्यक पौष्टिक तत्व मिळणे आवश्यक आहे. किती अन्नाची गरज आहे त्याऐवजी, योग्य प्रमाणात व्हिटॅमिन-प्रोटीन मिळणे आवश्यक आहे. रेशन कार्डप्रमाणे न्यूट्रीशन कार्ड देखील बनवले जावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser