आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिर भूमिपूजन:'मर्यादा पुरूषोत्तम भगवान राम सर्वोच्च मानवीय गुणांचे स्वरूप आहेत;' भूमिपूजनानंतर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आज अयोध्येत प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. या भूमिपूजन सोहळ्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी एक ट्विट करत प्रभू रामाच्या अनेक गुणांचे वर्णन केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले की, 'मर्यादा पुरूषोत्तम भगवान राम सर्वोच्च मानवीय गुणांचे स्वरूप आहेत. राम आपल्या मनात खोलवर बसलेल्या मानवतेची मूळ भावना आहे. राम प्रेम आहे. ते कधीच द्वेषातून प्रकट होऊ शकत नाहीत. राम करुणा आहेत. ते कधी क्रूरतेत प्रकट होऊ शकत नाही. राम न्याय आहे. ते कधी अन्यायातून प्रकट होऊ शकत नाही,' असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

माझे येणे स्वाभाविक होते- नरेंद्र मोदी

राम जन्मभूमी ट्रस्टने मला येथे आमंत्रित करुन या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी दिली हे माझं सौभाग्य आहे. यासाठी मी त्यांचे आभार मानतो. भारत एक सुवर्ण इतिहास रचत आहे. आज पूर्ण भारत राममय आहे. पूर्ण देश रोमांचित झाला आहे. प्रत्येक मनात दीपमय झालंय. आज संपूर्ण भारत भावूक झाला आहे. शतकांची प्रतिक्षा आज संपत आहे. कोट्यवधी लोकांना आज विश्वासच बसत नसेल की आपण जीवंतपणीच हा क्षण पाहिला.

ज्या पद्धतीने मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे माध्यम झाले, दलित, वंचित अशा समाजातील प्रत्येक घटकांनी महात्मा गांधींना सहयोग केला, तसेच आज देशातील प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराच्या निर्माणाचे काम सुरु झाले आहे. जसा रामसेतू तयार झाला, तसाच गावागावातून आलेल्या विटा, माती, नद्याचं पाणी येथे प्रेरणा देत आहे. ही अमोघ शक्ती आहे. हे न भूतो न भविष्यती आहे.

हनुमानजींच्या आशिर्वादाने राम मंदिराच्या भूमिपूजनाला सुरुवात झाली. हे मंदिर आपले आधुनिक प्रतिक बनेल. शाश्वत आस्थेचे, राष्ट्रीय भावनेचे प्रतिक बनेल. हे मंदिर येणाऱ्या पिढ्यांना आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा देईल. या मंदिरामुळे अयोध्येची प्रतिमाच नाही बदलणार, तर येथील अर्थशास्त्रही बदलेल. प्रत्येक क्षेत्रात नव्या संधी तयार होतील. पूर्ण जगातील लोक प्रभू राम आणि माता जानकीचे दर्शन करायला येतील.

बातम्या आणखी आहेत...