आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi PM Modi 91 Time Scolding Remark Priyanka Gandhi | Karnataka Election

कर्नाटकसाठी काय केले ते मोदी सांगत नाही:राहुल यांचा निशाणा, कर्नाटकात येऊन फक्त स्वतःबद्दल बोलतात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

91 वेळा शिवी दिल्याच्या पंतप्रधान मोदींच्या विधानावर प्रियंका गांधींनंतर आता राहुल गांधींनीही निशाणा साधला आहे. कर्नाटकमध्ये येऊन पंतप्रधान त्यांना 91 वेळा शिवी देण्यात आल्याचे सांगतात. मात्र कर्नाटकसाठी काय केले हे बोलत नाही अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे.

गेल्या 3 वर्षांत कर्नाटकसाठी तुम्ही काय केले ते मोदीजींनी सांगावे. राज्यात शिक्षण, आरोग्य आणि युवकांसाठी काय केले ते सांगावे. ही निवडणूक तुमच्यासाठी नाही, तर कर्नाटकच्या भविष्यासाठी आहे. तुम्ही म्हणता की तुम्हाला 91 वेळा शिवी देण्यात आली. मात्र कर्नाटकसाठी तुम्ही काय केले याबद्दल तर तुम्ही बोलतच नाही, असे राहुल गांधी कर्नाटकच्या तुमकुरमधील सभेला संबोधित करताना म्हणाले.

कर्नाटकच्या जनतेला माहिती आहे, हे 40 टक्के कमिशनवाले सरकार आहे

राहुल गांधींनी यावेळी 40 टक्के कमिशनच्या आरोपांचाही पुनरूच्चार केला. भाजपने गेल्या 3 वर्षांत कर्नाटकात केवळ भ्रष्टाचार केला. कर्नाटकच्या लोकांनी भाजप सरकारला 40 टक्के कमिशनचे सरकार हे नाव दिले. पंतप्रधानांनाही याबद्दल माहिती आहे. मात्र त्यांनी यावर कारवाई का केली नाही हे मी त्यांना विचारू इच्छितो असे राहुल म्हणाले.

राहुल यांची आश्वासने

  • गृहलक्ष्मीः महिलांना दरमहा 2000 रुपये
  • गृहज्योतीः 200 युनिट मोफत वीज
  • महिलांना मोफत बस प्रवास
  • अन्न भाग्यः कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 10 किलो तांदूळ
  • युवा निधीः प्रत्येक पदवीधरास दोन वर्षांपर्यंत 3,000 आणि डिप्लोमा होल्डरला 1500 रुपये दरमहा
  • शेतकऱ्यांना 5 वर्षांत दीड लाख कोटी रुपये देणार
  • अर्थसंकल्पात दरवर्षी शेतकऱ्यांसाठी 30 हजार कोटी रुपये
  • नारळ आणि सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना एमएसपी
  • दूधावरील अनुदान 5 रुपयांवरून वाढवून 7 रुपये करणार

ही बातमीही वाचा...

प्रियंका म्हणाल्या- मोदींनी माझ्या भावाकडून शिकावे:तो देशासाठी गोळी झेलायलाही तयार; आम्हाला दिलेल्या शिव्यांचे तर पुस्तक होईल

कर्नाटकच्या जमखंडीमधील एका सभेला संबोधित करताना काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. मोदीजींनी माझ्या भावाकडून शिकायला हवे असे प्रियंका म्हणाल्या. माझा भाऊ म्हणतो की मी देशासाठी शिव्याच नव्हे तर गोळीही झेलायला तयार आहे. पंतप्रधान तर यादी तयार करतात आणि सांगतात की त्यांना 91 वेळा शिवी देण्यात आली. या लोकांनी माझ्या कुटुंबाला जितक्या शिव्या दिल्या, त्याची यादी बनवली तर एक पुस्तक छापावे लागेल अशा शब्दांत प्रियंकांनी मोदींवर निशाणा साधला. (वाचा पूर्ण बातमी)