आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भारत जगातील एकमेव असा देश आहे जेथे कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लॉकडाउन हटवले जात आहे. लॉकडाउनचा उद्देश अयशस्वी झाला आहे, त्याचा परिणाम देशाला भोगावा लागत आहे. चार टप्प्यांच्या लॉकडाउननंतरही पंतप्रधान आशा करत असलेले परिणाम मिळाले नाही.
केंद्र सरकारने प्रवासांच्या मदतीसाठीचे उपया सांगावे
राहुल म्हणाले की, पंतप्रधान सुरुवातील फ्रंट फुटवर खेळत होते, मात्र लॉकडाउन फेल झाल्यानंतर ते बॅकफूटला गेले. त्यांनी पुन्हा एकदा पुढे यावे. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्य सल्लागार म्हणाले होते की, मे अखेरपर्यंत कोरोनाचा परिणाम कमी होईल मात्र असे काहीच घडत नाही. आता सरकारने पुढील योजना सांगाव्यात. लॉकडाउन उघडण्याच्या धोरणात स्थलांतरितांना आणि राज्यांना मदत करण्यासाठी कोणती व्यवस्था केली? याबाबतही त्यांनी सांगावे.
गरिबांच्या हातात पैसा पोहचणे आवश्यक
सरकारने दिलेल्या आर्थिक पॅकेजमुळे काही काहीही होणार नाही. लोकांचा हातात पैसा पोहचायला हवा. सामान्य लोक आणि इंडस्ट्रींना आर्थिक मदत मिळाली नाही तर त्याचे भयंकर परिणाम होतील. केंद्राने राज्यांनाही मदत करावी. त्याशिवाय काँग्रेस शासित राज्यांना अडचणींचा सामना करावा लागले असे राहुल गांधी म्हणाले.
सीमाप्रश्नावरही सरकार पारदर्शक नाही
चीनसोबत सुरू असलेल्या वादाबाबत राहुल म्हणाले की, याप्रकरणी सरकारने केव्हा आणि काय झाले हे स्पष्टपणे सांगावे? नेपाळमध्ये काय झाले आणि आता लडाखमध्ये काय घडत आहे? याबद्दल अद्याप पारदर्शकता नाही.
दोन महिन्यांत राहुल यांची चौथी पत्रकार परिषद
लॉकडाउनच्या मागील 60 दिवसांत राहुल गांधींची ही चौथी पत्रकार परिषद होती. यादरम्यान त्यांनी दोन वेळा राष्ट्रीय मीडिया आणि दोन वेळा स्थानिक मीडियाशी चर्चा केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.