आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Property । Uttarakhand Woman Gives Her Property Worth Rs 50 Lakh To Rahul Gandhi, Said Country Needs Him

राहुल गांधींच्या नावे महिलेने केली सर्व संपत्ती:50 लाखांची मालमत्ता, 10 तोळे सोनेही केले राहुल गांधींच्या नावे; म्हणाल्या- देशाला त्यांची गरज!

डेहराडून4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमधील एका महिलेने आपली सर्व संपत्ती काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावे केली आहे. डेहराडूनमधील एका 78 वर्षीय महिलेने आपली सर्व संपत्ती राहुल गांधींना दिली. यात 50 लाखांची स्थावर-जंगम मालमत्ता तसेच 10 तोळे सोन्याचा समावेश आहे.

कोर्टातून मृत्युपत्र तयार करून घेतले

डेहराडून येथील रहिवासी असलेल्या 78 वर्षीय महिला पुष्पा मुंजियाल यांनी राहुल गांधींना आपल्या सर्व संपत्तीचे मालक बनवले आहे. त्यांनी डेहराडून कोर्टात राहुल गांधी यांना मालकी हक्काचे मृत्युपत्र सादर केले आहे.

या महिलेचे म्हणणे आहे की, त्यांच्यावर राहुल गांधींच्या विचारांचा खूप प्रभाव आहे, म्हणून त्या आपली संपत्ती राहुल गांधींच्या नावावर करत आहेत. महिलेच्या संपत्तीमध्ये 50 लाखांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आणि 10 तोळे सोन्याचाही समावेश आहे.

का घेतला महिलेने हा निर्णय?

या मुद्द्यावर काँग्रेसचे महानगर अध्यक्ष लालचंद शर्मा म्हणाले की, महिलेने राहुल गांधी यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचे मृत्यूपत्र माजी प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांना त्यांच्या निवासस्थानी दिले आहे. काँग्रेसचे महानगर अध्यक्ष लालचंद शर्मा म्हणाले की, या महिलेने सांगितले की, देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत राहुल गांधी यांच्या कुटुंबाने नेहमीच देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. मग त्या इंदिरा गांधी असोत की राजीव गांधी. या देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. यानंतर पक्षात अंतर्गत तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, महिलेने राहुल गांधी आणि त्यांचे विचार देशासाठी गरजेचे असल्याचे सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...