आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Questioned Adani Group; Adani Group Counter To Rahul Gandhi | Hindenburg Report | Gautam Adani

आरोप:राहुल गांधींनी विचारले होते, 20 हजार कोटी कोणाचे; प्रत्युत्तरात अदानी समूहाने 4 वर्षांचा तपशील दिला, म्हणाले- हिस्सा विकून उभारले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी, 8 एप्रिल रोजी एका ट्विटमध्ये अदानी प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले. ट्विटमध्ये लिहिले की, ‘ते सत्य लपवतात, म्हणूनच ते दररोज दिशाभूल करतात. अदानींच्या कंपन्यांमधील 20,000 कोटी रुपयांचा बेनामी पैसा कोणाचा आहे? राहुल यांनी काँग्रेसच्या 5 माजी नेत्यांची नावेही अदानीशी जोडली होती.

राहुल गांधींच्या या आरोपांना अदानी समूहाने सोमवारी प्रत्युत्तर दिले. निवेदन जारी करताना, समूहाने म्हटले- 2019 पासून, समूह कंपन्यांनी त्यांचे स्टेक विकून 2.87 बिलियन डॉलर (रु. 23,525 कोटी) उभे केले, त्यापैकी 2.55 बिलियन डॉलर (रु. 20,902 कोटी) व्यवसायात पुन्हा गुंतवले गेले.

अदानी समूहाने निवेदनात म्हटले -

  • इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी PJSC, एक अबू धाबी-आधारित जागतिक धोरणात्मक गुंतवणूक कंपनी असून कंपनीने समूह कंपन्यांमध्ये 2.593 अब्ज डॉलर (रु. 21,255 कोटी) गुंतवणूक केली. ही गुंतवणूक अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि अदानी एनर्जी लिमिटेड (AGEL) मध्ये करण्यात आली आहे.
  • अदानी टोटल गॅस लिमिटेड आणि AGEL मधील हिस्सेदारी विकून गुंतवणूकदारांनी 2.783 अब्ज डॉलर (सुमारे 22812 कोटी रुपये) उभे केले. हा पैसा अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये पुन्हा गुंतवण्यात आला.
फेब्रुवारीमध्ये लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत भाषण करताना राहुल गांधींनी मोदी आणि अदानींचे पोस्टरही दाखवले होते.
फेब्रुवारीमध्ये लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत भाषण करताना राहुल गांधींनी मोदी आणि अदानींचे पोस्टरही दाखवले होते.

फायनान्शिअल टाईम्सचे आरोप फेटाळले, बातमी मागे घेण्यास सांगितले

लंडनच्या फायनान्शिअल टाईम्सने अदानी समूहाबाबत एक बातमी प्रसिद्ध केली होती. ज्यामध्ये अदानी समूहाकडून एफडीआय (थेट परकीय गुंतवणूक) प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. त्यापैकी बहुतांश गौतम अदानी यांच्या कुटुंबाशी संबंधित विदेशी कंपन्यांमधून आले होते. परदेशी संस्थांनी 2017 ते 2022 पर्यंत अदानी कंपन्यांमध्ये किमान 2.6 अब्ज डॉलर गुंतवणूक केली आहे, जी समूहाला मिळालेल्या एकूण FDI च्या 45.4% आहे.

मात्र, सोमवारी जाहीर झालेल्या अदानी समूहाचा हा तपशील विदेशी वृत्तपत्र फायनान्शियल टाईम्सच्या अहवालाशी आणि देशात सुरू असलेल्या वादांशी जोडला जात आहे. वास्तविक, समूहाने हे आरोप फेटाळले आहेत, त्यांनी म्हटले आहे की ज्या बाबत प्रश्न विचारला जात आहे, ती गुंतवणूक आधीच 28 जानेवारी 2021 आणि 23 जानेवारी 2021 रोजी सार्वजनिकरित्या जाहीर केली गेली होती.

समूहाने फायनान्शियल टाईम्सला बातमी मागे घेण्यास सांगितले आहे. वृत्तपत्राला पाठवलेल्या पत्रात समूहाने असे लिहिले आहे की, ‘अदानी सूहाला संपवण्याची ही स्पर्धा आकर्षक असू शकते, हे आम्हाला माहिती आहे. परंतु आम्ही सिक्युरिटीजच्या नियमांचे पूर्णपणे पालन करतो. मालकी आणि निधीबद्दल आम्हाला काहीही अंधारात ठेवायचे नाही.

5 बंडखोरांचा अदानींशी जोडला संबंध

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पुन्हा एकदा अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाला हात घातला आहे. 'ते सत्य लपवतात, म्हणूनच दररोज दिशाभूल करतात, असे ते एका ट्विटमध्ये म्हणाले. यावेळी त्यांनी अदानींच्या कंपन्यांतील 20 हजार कोटींची बेनामी रक्कम कुणाची आहे?', असा सवालही केला. पूर्ण बातमी वाचा...