आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राफेल डीलवरून काँग्रेस पुन्हा ॲक्टिव्ह:राहुल यांचा प्रश्न- मोदींना तपास टाळायचा आहे, कारण मित्रांना वाचवायचे आहे; फोटो शेअर करत लिहिले- चोराची दाढी...

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राफेल डीलवरून काँग्रेस पुन्हा एकदा अटॅकिंग मोडमध्ये आली आहे. राहुल गांधी यांनी रविवारी एक ट्विट करून विचारले आहे की, जॉईंट पार्लियामेंट्री कमेटी (JPC)चा तपास मोदी का टाळत आहेत? राहुल यांनी चार ऑप्शनही दिले आहेत.

1. मोदींना अपराध माहिती आहे.
2. त्यांना आपल्या मित्रांना वाचवायचे आहे.
3. जेपीसीला राज्यसभेची जागा नको आहे.
4. हे सर्व पर्याय बरोबर आहेत.

राहुल गांधी यांनी इंस्टाग्रामवरही एक पोस्ट केली आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी एक छायाचित्र पोस्ट केले असून यामध्ये चेहरा अर्धा आहे आणि ज्याच्या दाढीवर राफेलचा फोटो आहे. यावर राहुल यांनी लिहिले आहे, चोरांची दाढी….राहुल यांनी येथे कोणाचेही नाव लिहिलेले नाही. परंतु छायाचित्रात राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दाढी दाखवल्याचे स्पष्ट दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...