आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Rajasthan Update; Kisan Andolan | Rahul Gandhi To Address Kisan Mahapanchayat, Rajasthan Farmer Peelibanga Padampura

राहुल गांधींचा राजस्थान दौरा:23 मिनिटांच्या भाषणात राहुल गांधींनी 12 वेळा घेतले मोदींचे नाव, म्हणाले - 3 कृषी कायद्यांनी 40% लोक बेरोजगार होतील

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधींनी हनुमानगढच्या पीलीबंगामध्ये शेतकरी महापंचायतेला संबोधित केले

दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलनाचा आज 79 वा दिवस आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी शुक्रवारी दोन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर जात आहेत. त्यांनी हनुमानगढच्या पीलीबंगामध्ये शेतकरी महापंचायतेला संबोधित केले. शेतकऱ्यांना सोप्या भाषेत कृषी कायद्यातील तृटी समजावून सांगितल्या. राहुल गांधी म्हणाले की, तिन्ही कृषी कायदे केवळ शेतकरी नाही, तर भारतातील 40 टक्के लोकांवर हल्ला आहे. आपण हे रद्द करुनच राहू.

23 मिनिटांच्या भाषणात राहुल गांधींनी 7 वेळा शेतकऱ्यांसोबत मजूर, छोट्या दुकानदारांचे नाव घेतले, 12 वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला.

पीलीबंगामध्ये राहुल गांधींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
1. भारताची 40% जनता शेती करते

हे तीन कृषी कायदे, यांचे लक्ष्य काय आहे, मोदीजी हे का आणत आहेत. हे मी तुम्हाला समजावून सांगितले. कृषी जगातील सर्वात मोठा बिझनेस आहे, कारण यामुळे कोट्यावधी लोकांना भोजन मिळते. आज भारतातील 40% जनता हा बिझनेस चालवते. म्हणजेच कोट्यावधी लोकांचा याच्याशी संबंध आहे. यामध्ये शेतकरी, मजूर, छोटे दुकानदार, व्यापाऱ्यांचा समावेश आहे. काँग्रेस पक्षाचा प्रयत्न राहिला आहे की, हा व्यवसाय कुणा एका व्यक्तीच्या हाती जाऊ देऊ नये. स्वातंत्र्यापासूनच आमचा उद्देश राहिला आहे की, यामध्ये 40% लोकांची भागीदारी राहावी.

2. तिन्ही कायद्यांने उद्योगपतींना फायदा
पहिला कायदा म्हणजे - देशातील कोणत्याही शेतकऱ्यांकडून एकादी व्यक्ती अमर्याद धान्य खरेदी करु शकते. जर असेल झाले तर मग मंडींची काय गरज राहिल. म्हणजेच हा कायदा मंड्यांना संपवण्याचा कायदा आहे. दुसरा कायदा म्हणजे - एखादा उद्योगपती कितीही भाजी, कितीही धान्य आणि फळे साठवून ठेवू शकतो. म्हणजेच - ती व्यक्ती संपूर्ण माल स्टोरेज करु शकते. ती व्यक्तीच यावर नियंत्रण मिळवेल. आज धान्य मंडीमध्ये विकले जाते. कुणीही साठवणूक करत नाही. दुसरा कायदा लागू झाल्याने साठवणूक वाढेल आणि असे देशातील सर्वात श्रीमंत लोकं करतील.

तिसरा कायदा म्हणजे - जेव्हा शेतकरी त्या उद्योगपतीसमोर जाऊन आपल्या पीकाची योग्य किंमत मागेल आणि ती किंमत न मिळाल्यास तो न्यायालयात जाऊ शकणार नाही. 40% लोकांचा व्यवसाय 2-3 लोकांच्या हातात जावा हा सरकारचा हेतू आहे. एकाच कंपनीने संपूर्ण देशाचे धान्य, फळ-भाज्या विकाव्या. जर असे झाले तर आज जे लोक भाजी, भुईमुग, हरबरा विकतात त्यांचे काय होईल. जे आज छोटे व्यापारी आहेत, त्यांचे काय होईल?

3. मोदी काहीना काही बोलत असतात
'बेरोजगारी वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रोज काहीना काही नवीन कारण शोधतात. ते रोज काहीना काही बोलतात. तुम्ही संसदेत पंतप्रधानांचा चेहरा पाहिला असेल. ते म्हणतात की, आम्हाला शेतकऱ्यांसोबत चर्चा करायची आहे. पण कोणत्या गोष्टीवर? तुम्ही हा कायदा रद्द करा, शेतकरी तुमच्यासोबत बोलायला तयार आहेत. आम्ही शेतकरी, मजूर, छोट्या व्यापाऱ्यांसोबत उभे राहून हा कायदा लागू होऊ देणार नाही. रद्द केल्याशिवाय राहणार नाही.'

बातम्या आणखी आहेत...