आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Ranks Third Among MPs Who Help People During Lockdown, Inspection Of Governance System

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:लॉकडाऊनच्या काळात जनतेला मदत करणाऱ्या खासदारांमध्ये राहुल गांधी तिसऱ्या क्रमांकावर!

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गव्हर्नआय सिस्टिमची पाहणी - उज्जैनचे भाजप खासदार अव्वल

काेराेना विषाणूमुळे लाॅकडाऊनच्या काळात आपल्या मतदारसंघातील लाेकांची मदत करण्याच्या श्रेणीत केरळच्या वायनाडचे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. उज्जैनचे भाजपचे खासदार अनिल फिराेजिया अव्वल तर आंध्रातील नेल्लूरचे वायएसआर काँग्रेस पक्षाचे खासदार अडाला प्रभाकर रेड्डी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.या खासदारांनी लाॅकडाऊनच्या काळात आपल्या मतदारसंघातील लाेकांना जास्तीत जास्त मदत केली, अशी माहिती दिल्ली सिटिझन एंगेजमेंट प्लॅटफाॅर्म गव्हर्नआय सिस्टिमच्या अहवालातून समाेर आली आहे. त्यासाठी ऑक्टाेबरमध्ये पाहणी करण्यात आली हाेती. संस्थेच्या मते १ ऑक्टाेबर ते १५ ऑक्टाेबर २०२० दरम्यान ५१२ खासदारांसाठी ३३, ८२, ५६० वैध नामांकने मिळाली हाेती. नामांकनाच्या आधारे सर्वाधिक मते मिळवणाऱ्या २५ खासदारांची यादी तयार करण्यात आली हाेती. नंतर सर्व खासदारांच्या मतदारसंघातील वास्तव परिस्थिती व लाेकांच्या प्रतिसादाच्या आधारे उत्कृष्ट १० खासदारांची निवड करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...