आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल गांधी म्हणाले:नोटाबंदी, चुकीची जीएसटी आणि लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था 40 वर्षांत प्रथमच प्रचंड मोठ्या मंदीत, तरी लोक यासाठी देवाला दोष देतात

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल म्हणाले - नोटबंदी, चुकीची जीएसटी आणि लॉकडाउन अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे मोठी उदाहरणे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीवर व्हिडिओ मालिका सुरू केली आहे. ट्विटरवर पहिला व्हिडिओ शेअर राहुल म्हणाले की, "देशाला आज ज्या आर्थिक शोकांतिकेचा सामना करावा लागला आहे त्या दुर्दैवी सत्याची आज पुष्टी होईल. भारतीय अर्थव्यवस्था 40 वर्षांत प्रथमच प्रचंड मंदीत आहे. असत्याग्रही लोक यासाठी देवाला दोष देत आहेत."

'नोटबंदी, जीएसटी आणि लॉकडाउन मोठी उदाहरणे'

राहुल म्हणाले की, भाजप सरकारने असंघटित अर्थव्यवस्थेवर हल्ला केला आहे. नोटबंदी, चुकीची जीएसटी आणि लॉकडाउन याचे 3 मोठे उदाहरणे आहेत. यापूर्वीही अनेक वेळा लॉकडाउन अयशस्वी झाल्याचे राहुल म्हणाले आहेत. ना कोरोना थांबला ना अर्थव्यवस्था वाचली. त्यांनी अलीकडेच सरकारला इशारा दिला होता की कोरोना संसर्गामुळे देशाचे इतके आर्थिक नुकसान झाले आहे की पुढील 5-6 महिन्यांत सरकार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकणार नाही.

राहुल यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला होता

राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप लावले होते. ते म्हणाले होते की, "एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की भारताला 90% टक्के रोजगार असंघटित अर्थव्यवस्था देते. हे लोक कोण आहेत? हे छोटे, मध्यम व्यवसायिक, शेतकरी आहेत. नरेंद्र मोदींनी या व्यवस्थेला संपवले आहे. आपण पाहाल की मोरेटोरियमची मुदत संपताच एकामागून एक कंपन्या बंद होतील."