आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पुन्हा एकदा अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाला हात घातला आहे. 'ते सत्य लपवतात, म्हणूनच दररोज दिशाभूल करतात, असे ते एका ट्विटमध्ये म्हणाले. यावेळी त्यांनी अदानींच्या कंपन्यांतील 20 हजार कोटींची बेनामी रक्कम कुणाची आहे?', असा सवालही केला.
राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये काँग्रेसच्या 5 माजी नेत्यांचाही अदानींशी संबंध जोडला. त्यांनी यासंबंधी ट्विटरवर एक फोटो शेअर केला. त्यात त्यांनी या नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला. त्यांनी अदानीतील (ADANI) 'A' शब्दाचा संबंध गुलाम (नबी आझाद) यांच्याशी, B चा शिंदे (ज्योतिरादित्य) यांच्याशी, 'A' चा किरण (रेड्डी), 'N' चा हिमंता (बिस्वा सरमा) व 'I' चा संबंध अनिल (अँटोनी) यांच्याशी जोडला. ते म्हणाले - 'मी भारताच्या आवाजासाठी संघर्ष करत आहे. त्यासाठी माझी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी आहे.'
अदानी मुद्यावर शरद पवारांची वेगळी भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अदानी प्रकरणी जेपीसी स्थापन करण्याच्या मुद्यावर काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचे हे विधान समोर आले आहे. शरद पवारांनी शुक्रवारी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अदानींना टार्गेट केले जात असल्याचा दावा केला होता.
त्यानंतर शनिवारी दुसऱ्याच दिवशी त्यांनी दिल्लीत स्पष्टीकरणही दिले होते. ते म्हणाले -'माझी मुलाखत अदानींवर नव्हती. त्यात मला एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात मी जेपीसी का नको हे सांगितले.'
शरद पवारांच्या अदानींप्रकरणी भूमिकेची खालील बातमी वाचा
अदानी घोटाळ्यावर भूमिका:हिंडेनबर्ग कोण माहिती नाही? जेपीसीत भाजपचेच बहुमत असेल तर ती उपयुक्त नाही- शरद पवार
अदानी घोटाळ्याची जेपीसीद्वारे चौकशी करावी, या मागणीसाठी काँग्रेससह विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच योग्य राहील, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत मांडले. त्यामुळे अदानी घोटाळ्यावरुन विरोधकांच्या एकीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जेपीसीत भाजप सदस्यांचीच संख्या अधिक राहील
शरद पवार म्हणाले, जेपीसीमध्ये लोकसभा व राज्यसभेत जो सर्वात मोठा पक्ष आहे, त्याच्याच खासदारांची संख्या अधिक असते. अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी आता जेपीसी बनवलीच तर त्यात भाजपचे 15 खासदार असतील. उर्वरित 6 ते 7 खासदार विरोधी पक्षातील असतील. ज्या जेपीसीत विरोधकांची संख्या एवढी कमी आणि सत्ताधाऱ्यांची संख्या अधिक असेल, अशा समितीच्या निर्णयावर शंका उपस्थित करायला वाव आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.