आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Said Before The All party Meeting That The Government Was In A Deep Sleep And Its Soldiers Had To Pay The Price

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे तिसरे वक्तव्य:सरकार गाढ झोपेत होते, आपल्या जवानांना याची किंमत मोजावी लागली, सर्वपक्षीय बैठकीपूर्वी केले वक्तव्य

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकार गाढ झोपेत होते, त्यांनी समस्या समजून घेतली नाही

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारत-चीन चकमकीच्या मुद्द्यावर  तिसऱ्यांदा सरकारवर निशाणा साधला आहे. चीनच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठकीपूर्वी राहुल गांधी यांनी तीन मुद्दे मांडले आहेत. 

  • गलवानमधील चीनचा हल्ला हा नियोजित कट होता
  • सरकार गाढ झोपेत होते, त्यांनी समस्या समजून घेतली नाही
  • शहीद झालेल्या जवानांनी याची किंमत मोजावी लागली

राहुल गांधी यांनी गुरुवारीही सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. ते म्हणाले होते की, आपल्या जवानांना निशस्त्र का पाठवण्यात आले? यासाठी कोण जबाबदारी आहे?

दोन दिवसांपूर्वी राहुल गांधींनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना डायरेक्ट प्रश्न केले होते. संरक्षण मंत्री म्हणाले होते की, गलवान खोऱ्यात आपले सैनिक शहीद झाल्याने दुःखी आहेत. दरम्यान तुम्ही चीनने नाव का घेत नाही. भारतीय सैन्याचा अपमान का करत आहात असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. 

पंतप्रधानांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी आज सायंकाळी 5 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये 20 प्रमुख पक्षांचे नेता सहभागी होतील. काँग्रेसकडून सोनिया गांधी आणि टीएमसीकडून ममता बॅनर्जी सहभागी  होण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टी आणि आरजेडीने दावा केला आहे की, त्यांना बोलावण्यात आले नाही.

मोदी भारत-चीनच्या मुद्द्यावर विरोधीपक्षांच्या प्रश्नांची उत्तर देतील. तसेच सरकार काय काम करत आहेत याविषयी माहिती देतील. सरकारने सर्व काही स्पष्ट करावे अशी मागणी सोनिया गांधींनी काही दिवसांपूर्वीच केली होती. 

बातम्या आणखी आहेत...