आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राहुल यांनी भाजपाला घेरले:सरकार कोरोनाच्या कमी टेस्टिंग आणि मृत्यूंची चुकीची माहिती देऊन खोटं बोलत आहे, नवीन पद्धतीने जीडीपीचे मूल्यांकन केले जात आहे, राहुल गांधींचा आरोप

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधी म्हणाले - लवकरच भ्रमाचा भोपळा फुटेल आणि भारताला यांची किंमत मोजावी लागेल
  • शनिवारी राहुल गांधींनी सरकारची तुलना ब्रिटेनचे माजी पंतप्रधान चेम्बरलेनसोबत केली होती

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी रविवारी ट्विट केले की, भाजप खोटे बोलण्याचे काम करत आहे. कोरोना व्हायरस, जीडीपी आणि चीन यासारख्या बाबींवर सरकार खोटे बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, सरकार कमी चाचण्या करून आणि मृत्यूविषयी खोटी माहिती देऊन कोरोनावर खोटे बोलत आहे. जीडीपीचे नवीन प्रकारे मूल्यमापन केले जात आहे. चीनच्या बाबतीत, मीडियाला धमकावून खोटे पसरवले जात आहे.

लवकरच भ्रम तुटेल - राहुल
राहुल गांधींनीही ट्विटमध्ये म्हटले आहे की लवकरच हा भ्रमाचा भोपळा फुटेल आणि त्याची किंमत भारताला मोजावी लागेल. यासह त्यांनी वॉशिंग्टन पोस्टची एक बातमीही शेअर केली. यामध्ये, कोरोनाची प्रकरणे भारतात दहा लाखांपेक्षा जास्त असतानाही मृत्यू कमी होण्याची बातमी आहे. बातमीत मृतांचा आकडा याबद्दलही संशय व्यक्त केला जात आहे. 

राहुल यांनी सरकारची तुलना चेम्बरलेनशी केली

राहुल गांधींनी शनिवारी केंद्र सरकारची तुलना ब्रिटिश पंतप्रधान नेव्हिल चेम्बरलेनशी केली. दुसरे महायुद्ध टाळण्यासाठी चेम्बरलेन जर्मनीच्या हुकूमशहा हिटलरकडे गेले होते. त्यांना वाटले की जर्मनी चेकोस्लोवाकियावर हल्ला करणार नाही, पण तसे झाले नाही आणि त्यानंतरच महायुद्ध सुरू झाले.