आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Said Economic Storm Has Not Come Yet, It Will Come; Prime Minister Narendra Modi Should Reconsider The Relief Package

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर विरोधीपक्ष:सरकारने सावकारी करू नये, गरिबांना रोख रक्कम द्यावी; काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची मागणी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन काढताना सावधगिरी बाळगा, आर्थिक वादळ येण्याचाही दिला इशारा

काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी लॉकडाऊन काळात केंद्राने दिलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर साशंकता उपस्थित केली. आर्थिक आघाडीवर वादळ येण्याचाही इशारा त्यांनी दिला. या आर्थिक वादळात खूप काही उद््ध्वस्त होणार आहे. त्यामुळे देशाला नुकसानीचा फटकाही बसेल, असा इशारा त्यांनी दिला.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आता लोकांच्या हातात पैसा असणे गरजेचे आहे. परंतु सरकार सावकाराप्रमाणे कर्ज वाटप करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्पुरत्या स्वरूपात का होईना किमान उत्पन्नाची न्याय योजना लागू करण्याचे आवाहन केले. थेट लोकांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत, असे राहुल गांधी म्हणाले.

थेट रक्कम खात्यात जमा करणे, मनरेगाचा कार्यकाळ २०० दिवस करणे, शेतकऱ्यांना निधी देण्याबाबत मोदींनी विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. राहुल गांधी म्हणाले, मुलांना काही दुखले-खुपले तर आई कर्जाऊ पैसे देत नाही, लगेच आर्थिक मदत देते. कर्जाचे पॅकेज नसावे. उलट शेतकरी व मजुरांच्या खिशात पैसे जमा झाले पाहिजेत.

मागणी निर्माण करण्यासाठी आपण पैसे न दिल्यास खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. आताच्या काळात सर्वात मोठी गरज मागणी-पुरवठा चेन सुरू करण्याची आहे. या पॅकेजबाबत सरकारने पुनर्विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.

स्थलांतरित मजुरांच्या समस्येवर बोलताना राहुल गांधी म्हणाले, जे लोक रस्त्यावरून पायी जात आहेत त्यांना आपण सर्वांनी मदत करण्याची गरज आहे. भाजप सत्तेवर आहे. त्यामुळे त्यांच्याकडे खूप मोठी साधने आहेत. त्याचा वापर त्यांनी करावा. काँग्रेस सत्तेवर असलेल्या राज्यांत मजुरांना मदत देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आम्ही थेट रक्कम त्यांच्या हातात देत आहोत. मनरेगात दुप्पट रोजगार देण्याचा प्रयत्न आहे.

लॉकडाऊन काढताना सावधगिरी बाळगा

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, लॉकडाऊन काढताना सावधगिरी घेण्याची गरज आहे. अर्थव्यवस्थाही कोसळू द्यायची नाही आणि वृद्धांचीही काळजी घ्यायची आहे. सुनियोजित पद्धतीने योजना तयार करून आपण दोन्ही बाबी हाताळू शकतो. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन आपण मोदींना केले होते हे त्यांनी खुलेपणाने मान्य करावे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. लोकल व्हाेकल तेव्हाच होईल, जेव्हा पोटात भोजन असेल, असे राहुल गांधी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...